शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी संपताच मोखाड्याला कोरड

By admin | Updated: February 15, 2016 02:55 IST

तालुक्यातील गावपाड्यांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. जानेवारीच्या अखेरच म्हणजे दोन महिने आधीच पाणीटंचाई उद्भवली आहे.

रवींद्र साळवे,  मोखाडातालुक्यातील गावपाड्यांपुढे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. जानेवारीच्या अखेरच म्हणजे दोन महिने आधीच पाणीटंचाई उद्भवली आहे. त्यामुळे परंपरागत टंचाईग्रस्त गावपाड्यांनी टँकरद्वारे तत्काळ पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी केली आहे. पर्जन्याचे प्रमाण घटल्याने सर्व उपाययोजनेचा बोजवारा उडाला असून ४५ वर्षांपूर्वी अर्थात १९७० मध्ये मोखाडा, जव्हारमध्ये जाणवलेली भीषण पाणीटंचाई यंदा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात प्रतिवर्षी सुमारे ३ हजार मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा मोखाड्यात सरासरी केवळ १ हजार ८५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच टंचाईग्रस्त असलेल्या गावपाड्यांमध्ये विहिरींनी तळ गाठला असल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईसाठी संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या गावपाड्यांमध्ये गोळीपाडा, घामोडी, दापटी, धामणी, स्वामीनगर आसे, तुगारवाडी, ब्राह्मणगाव या गावपाड्यांसह गवरीचापाडा, पेडक्याचीवाडी यांचा समावेश आहे.टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार...मागील वर्षी ३१ गावे आणि ४९ पाडे अशा एकूण ८० गावपाड्यांतील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले होते. त्यासाठी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. परंतु, या वर्षी ही स्थिती भयावह होणार आहे, असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी मार्च महिन्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, यंदा तो आताच सुरू करावा लागणार आहे व पाणीटंचाईत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून बोलले जात आहे. रोजगार हमी योजनेतून विहीर योजनेसाठी ४ कोटी मिळूनही सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. जिल्हा प्रशासनाने २८ ग्रामपंचायतींमध्ये २१५ विहिरींना सन २०११ ते २०१२ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, यापैकी ४९ विहिरी रद्द केल्या आणि आतापर्यंत फक्त ४२ सिंचन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ९३ विहिरी अपूर्ण आहेत. रद्द झालेल्या ८५ विहिरींचे प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने पाठवले आहेत, तर अद्यापपर्यंत ५१ विहिरींच्या कामांना सुरुवातच करण्यात आलेली नाही. यावरून कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सिंचनाच्या प्रश्न मार्गी लागलेला नाही.पाणी अडवा पाणी जिरवा, ही संकल्पनाही लघुपाटबंधारे विभागाने बासनात गुंडाळली. तालुक्यातील सिंचनाची समस्या सुटावी, यासाठी २०१२-१३, ते २०१४-१५ च्या दरम्यान ३ कोटी १९ लाख ६६ हजार खर्च करून तालुक्यातील गावपाड्यांमध्ये २० बंधारे बांधले आहेत. परंतु, सदोष बांधकामांचा अभाव असल्याने या बंधाऱ्यांना गळती लागली असून त्यात एक थेंबही पाणी नाही.संपूर्ण मोखाडा तालुका टंचाईमुक्त व टँकरमुक्त करणार, असे आश्वासन मंत्री महोदयांनी अनेकदा आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे. यामुळे याकडे गंभीरतेने लक्ष देऊन मोखाडा तालुका टँकरमुक्त करण्याची गरज आहे.