डॉ. राजू मुरुडकरच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 10:07 PM2021-04-11T22:07:32+5:302021-04-11T22:11:15+5:30

दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले आहेत

Dr. Raju Murudkar's police custody extended for another two days | डॉ. राजू मुरुडकरच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ

ठाणे न्यायालयाचे आदेश

Next
ठळक मुद्देठाणे न्यायालयाचे आदेशडॉ. मुरुडकर याच्या ऐरोली येथील घरीही एसीबीच्या पथकांनी घेतली झडती

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दीड कोटींच्या व्हेंटीलेटर खरेदीचा ठेका मिळवून देण्याच्या बदल्यामध्ये पाच लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडलेल्या ठाणे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरु डकर याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने रविवारी दिले आहेत. डॉ. मुरुडकरच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर ठाणे न्यायालयाने हे आदेश दिले.
डॉ. मुरु डकर याने ठाणे महापालिकेत ३० व्हेंटिलेटर पुरविण्यासाठी निविदा मंजूर करून देतो, असे सांगून निविदेच्या एकूण रकमेच्या दहा टक्क्यांप्रमाणे १५ लाखांच्या रकमेची मागणी संबंधित व्हेंटिलेटर पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे केली होती. त्यातील पहिला पाच लाखांचा हाप्ता घेताना ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका खासगी रु ग्णालयात डॉ. मुरुडकर याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली होती. शुक्रवारी ठाणे न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. याच कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तेंव्हा त्याच्या कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, डॉ. मुरुडकर याच्या ऐरोली येथील घरीही एसीबीच्या पथकांनी झडती घेतली. मात्र, या झडतीमध्ये या पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Dr. Raju Murudkar's police custody extended for another two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.