शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात 20 हजार मालमत्ताधारकांना दुबार कर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 23:52 IST

भरत गंगोत्री यांचा आरोप : पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील सावळ्यागोंधळामुळे २० हजारापेक्षा जास्त मालमत्ताधारकांना दुबार मालमत्ता कराची बिले जात असल्याचा आरोप सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी केला आहे. यामुळे मालमत्ता कर विभागाची थकबाकी फुगली असून दुबार नोंदणी असलेल्या व अस्तित्वात नसलेल्या मालमत्ता रद्द करण्याची मागणी गंगोत्री यांनी आयुक्तांकडे केली आहे.

उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केली असून दुबार नोंदणी व अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेमुळे करवसुली समाधानकारक होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मालमत्ता कर विभागात दुबार नोंदणी असलेल्या व अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेची संख्या २० हजारापेक्षा जास्त असून त्याची थकबाकी ९७ कोटीपेक्षा जास्त असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी अशा मालमत्ता रद्द करण्याची यादी स्थायी समितीकडे विभागाने पाठविली होती. मात्र त्याचे पुनसर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर अद्यापही त्याबाबत निर्णय झालेला नाही. अशा मालमत्तेच्या नोंदी रद्द न केल्यास, खऱ्या मालमत्तेची संख्या व एकूण थकबाकी रक्कम महापालिकेला मिळू शकणार नाही. महापालिका हद्दीतील धोकादायक इमारती पाडण्यात आल्या आहेत. तसेच अनेक इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. त्यांना जुनी मालमत्ता करांची बिले जात आहेत. संभाजी चौकातील एका इमारतीच्या बेकायदा बांधकामावर १९९६ मध्ये पाडकाम कारवाई केली. मात्र तेव्हापासून सहा सदनिका व दोन दुकानांची नियमित मालमत्ता कराची बिले निघत आहेत. याबाबत कर विभागाला महिती देऊनही बिले रद्द करण्याची तसदी  घेतलेली नाही, अशी टीका गंगोत्री यांनी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी यादी स्थायीला दिली होतीमहापालिका मालमत्ता कर विभागाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण एका खासगी कंपनीकडून सुरू आहे. सर्वेक्षणात दुबार व अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेची निश्चित संख्या उघड झाल्यावर अशा मालमत्ता रद्द करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी दुबार व अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेची यादी स्थायी समितीला पाठविल्याची माहिती विभागाचे कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली.