शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

दुधापाठोपाठ चहा पावडरमध्येही भेसळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:10 AM

गोड चहाचा घोट घेतल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही, त्यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडू बातमी दिली आहे.

ठाणे : गोड चहाचा घोट घेतल्याशिवाय ज्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही, त्यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडू बातमी दिली आहे. चहा पावडरला केसरी रंग लावून विकणाऱ्या मुंब्रा येथील एका एजन्सीचा पर्दाफाश ‘एफडीए’ने केला असून माणसाला ताजेतवाणे करणारा चहा बनवण्यासाठी भेसळयुक्त चहा पावडरची विक्री येथून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. तब्बल एक हजार ९८ किलो चहा पावडर आणि ९५ किलो केसरी रंग असा एक लाख ३० हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल एफडीएने येथून हस्तगत केला.मुंब्रा-कौसातील कादर पॅलेस येथील हरमन मंजिल परिसरात रूम नंबर ८ आणि ९ मध्ये सुरू असलेल्या मे. इनाम टी एजन्सीत विनापरवाना चहा पावडर तयार केली जात असल्याची माहिती ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, कोकण विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, यू.एस. लोहकरे, रा.द. मुंडे आणि संतोष सिरोसिया यांच्या पथकाने मंगळवारी या एजन्सीवर छापा टाकला. त्यावेळी तिथे विनापरवाना चहा पावडरवर प्रक्रि या सुरू असल्याचे आढळून आले.चहा पावडरला केसरी रंग लावून अडीचशे ग्रॅम पॅकिंगमध्ये तिची विक्र ी करण्यात येत असल्याचे आढळून आल्यावर तेथून एक हजार ९८ किलो चहा पावडर व ९५ किलो केसरी रंग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही एजन्सी विनापरवाना व्यवसाय करत असल्याने व चहा पावडरला खाद्यरंग लावून त्याची विक्र ी करत असल्याने अन्न परवाना नोंदणी नियमन २०११ अंतर्गत त्या ठिकाणी व्यवसाय न करण्याबाबतचे निर्देश दिल्याची माहिती सहायक आयुक्त राजेंद्र रु णवाल यांनी दिली. याशिवाय, तीन चहा पावडरचे व भेसळीसाठी वापरलेल्या केशरी रंगाचे चार नमुने घेतल्याची माहितीही एफडीएच्या अधिकाºयांनी दिली.मागील तीन ते चार महिन्यांपासून मुंब्य्रात विनापरवाना चहा पावडरला केसरी रंग लावला जात आहे. ही भेसळयुक्त चहा पावडर प्रामुख्याने रस्त्यांवरील टी-स्टॉलवर वापरली जात होती. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांत भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यास पाच लाखांच्या दंडाची तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्या काही दिवसांत भेसळयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढत आहे़ अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे नागरिकांपर्यंत भेसळयुक्त पदार्थ पोहोचत नाही़ गेल्या दहा महिन्यात मुंबईतून एफडीएने सुमारे ८० हजार रूपयांचे भेसळयुक्त दुध पकडले़ झोपडपट्टी भागात ही भेसळ अधिक प्रमाण होत होती़ आता भिवंडी येथे झालेल्या कारवाईने सर्वसामान्यांना टपरीवर चहा पिणेही धोक्याचे ठरेल़>कमी खर्चात कडक चहा; भेसळयुक्त पावडर घेणे होते फायद्याचेमुंब्य्रातील मे. इनाम टी एजन्सीच्या भेसळयुक्त चहाचा खप मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. चहा पावडरला केसरी रंग लावल्यामुळे पावडरचे वजन वाढायचे. त्यामुळे ती बाजारभावापेक्षा कमी दरात विकणे एजन्सीला परवडत होते. स्वस्त दरामुळे पावडरचा खप लवकरच वाढला. ही भेसळयुक्त पावडर विकत घेणे चहाविक्रेत्यांसाठीही फायद्याचे होते.साधारण चहा पावडरचा चहा बनवताना पावडर जास्त प्रमाणात वापरावी लागते आणि बराच वेळ उकळावी लागते. त्यामुळे चहाविक्रेत्यांचा खर्च वाढतो. भेसळयुक्त चहा पावडर कमी प्रमाणात टाकली, तरी चहाला लगेच आकर्षक रंग येतो. त्यामुळे ती कमी प्रमाणात उकळावी लागते. त्यामुळे चहा पावडर आणि इंधनही कमी लागते.चहाविक्रेत्यांचा यात दुहेरी फायदा असतो. गर्दीच्या ठिकाणचे चहाविक्रेते हे मुख्यत्वे मे. इनाम टी एजन्सीचे ग्राहक होते. रेल्वे स्टेशनसारख्या भागात ग्राहक घाईगडबडीत असतात. या भागातील ग्राहक चहाचा दर्जा किंवा चवीच्या भानगडीत बहुधा पडत नाही. त्यामुळे मुंब्य्रासह ठाणे, कळवा आणि दिवा रेल्वे स्टेशन परिसरातील चहाविक्रेत्यांना मे. इनाम टी एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त चहापावडरची विक्री केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.