शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

सोसायट्यांची दारे उघडली पण मानसिकता बदलत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 11:33 PM

संडे अँकर । घरकामगार महिलांची फरपट कायम : लॉकडाऊननंतर समस्या जैसे थे, उपासमारीची आली होती वेळ

स्रेहा पावसकर।

ठाणे : अनलॉकनंतर काही कार्यालये, उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, आमची कामं अजूनही सुरू झाली नाहीत. सुरुवातीला आम्हाला सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जात होता. अनलॉकच्या काही दिवसांनंतर तो खुला केला गेला. आमच्यासाठी सोसायट्यांची दारं उघडली, परंतु घरमालकांकडूनच आम्हाला बोलावले जात नाही. त्यांची मानसिकताच अजून बदललेली नाही. आमची फरपट अजूनही सुरूच आहे, अशा शब्दांत आपली व्यथा मांडली आहे, ती ठाण्यातील अनेक घरकामगार महिलांनी.

लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योगधंदे, कार्यालये बंद झालीत. मात्र, अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले. हातावर पोट असणाऱ्या घरकामगार महिलांची कामं मात्र पूर्णपणे बंद होती. लॉकडाऊनचे चार महिने हाताला काम नसल्याने अगदीच उपासमारीची वेळ आली होती.अनलॉक झाल्यावर सुरुवातीला या महिलांना सोसायट्यांमध्ये प्रवेश दिले जात नव्हते. मात्र, आता हळूहळू ठाण्यातील सोसायट्यांमध्ये प्रवेश दिले जात आहेत. त्यÞांची दारं त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. परंतु, ज्यांच्या घरी कामं करायचीत, त्या मालकांच्या घरांचे दरवाजे अजून त्यांच्यासाठी उघडले जात नाहीत. अजूनही त्यांना घरी कामासाठी बोलावले जात नाही. मुळात अजूनही रेल्वे सुरू झालेली नसल्याने अनेक घरांतील महिला या नोकरीला जात नाहीत. त्यामुळे काहींना घरकामगारांची आवश्यकता वाटत नाही. काही घरांमधून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरील व्यक्तीला म्हणजेच या घरकामगारांना बोलावण्यास टाळाटाळ केली जाते. तर, काहींनी आम्हालाही घरकामगार ठेवणे परवडत नसल्याचे सांगितले.परिणामी, घरकाम करणाºया महिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ठाणे शहरात सध्याच्या घडीला नोंदणीकृत हजार-दीड हजार घरकामगार महिला असल्या, तरी नोंदणी नसलेल्या हजारो महिला आहेत.या सर्वांनाच कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण झाले आहे. अनेकांनी जमापुंजी खर्च करून इतके दिवस ढकलले आहेत. काहींनी व्याजाने पैसे काढूनही घरखर्च भागवला.सोसायट्यांत प्रवेश दिले जातात. मात्र, घरमालकांची मानसिकता कोण बदलणार? आम्हाला कामावर ठेवा म्हणून आम्ही जबरदस्ती नाही करू शकत. परंतु, घरकामगार महिला इतर चार ठिकाणची कामं करून येतात, त्यामुळे त्या कोरोनावाहक आहेत की काय? अशा पद्धतीने आमच्याकडे पाहिले जाते. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मुलंबाळं आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हीही योग्य ती खबरदारी घेतो. फक्त आम्हाला कामाची गरज आहे.-सुनीता डिमोले, घरकामगारअनेक घरकामगार महिलांच्या मालकांनी त्यांना कोरोना गेला की कळवतो, असे सांगितले आहे. तर, काहींनी त्या महिलांशी संपर्कही ठेवलेला नाही. एकदोन टक्के मालकांनी घरकामगारांचे पूर्ण सहा महिन्यांचे पगार दिले. पण, उर्वरित घरकामगारांना काम नसल्याने त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. काम करण्याची तयारी आहे, फक्त त्यांना काम द्यावे. तसेच सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा.- रेखा जाधव, ठाणे जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय घरकामगार चळवळ

टॅग्स :thaneठाणे