Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:19 IST2025-09-27T16:17:53+5:302025-09-27T16:19:32+5:30
Dombivli Viral Video: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
Dombivli Crime News: डोंबिवलीतील एक व्हिडीओ जो बघून तुम्हाला धक्का बसेल. एक तरुण ११व्या मजल्यावर लटकलेला आहे. त्याचे हात अचानक अचानक सैल होतात आणि तो खाली कोसळतो. बहुमजली इमारतीवरून खाली पडल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्याने हात सोडून दिले, अशी प्राथमिक माहिती आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
११व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचं ऋषिकेश परब (वय २२ वर्षे) असे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिममधील राहुलनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.
तरुणाने ११व्या मजल्यावरून मारली उडी
प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश परबने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. काही वादामुळे तो त्रस्त होता. ही घटना घडण्यापूर्वी तो बराच वेळ जिन्यामध्ये बसून होता. नंतर जिन्याला असलेल्या सुरक्षा भिंतीजवळ तो आला आणि बाहेरच्या बाजूने लोंबकळला.
हा प्रकार समोरच्या इमारतीत असलेल्या तरुणाने मोबाईलमध्ये शूट केला. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी आले. जवानांकडून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होण्यापूर्वीच त्याने हात सोडले.
डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आयुष्य संपवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#dombivli#maharashtra#CrimeNewspic.twitter.com/u9AQECUZhP
— Lokmat (@lokmat) September 27, 2025
११व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी ऋषिकेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. त्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.