शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 3:14 PM

राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत.

ठाणे- 'कोरोना'ग्रस्त रुग्ण सर्वसामान्य रुग्णालयात न ठेवता सरकारने जाहीर केलेल्या कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश ठाणे पालिका प्रशासनाने धाब्यावर बसवले आहेत. ठाण्यातील पंचतारांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या ज्युपिटर रुग्णालयाचा कोव्हिड रुग्णालयाच्या यादीत समावेश नसतानाही याठिकाणी कोरोना रुग्ण ठेवल्याने येथील डाॅक्टर व कर्मचार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या जसलोक व व्होकार्ट रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णामुळे येथील कर्मचारी व डाॅक्टरांदेखील या आजाराची लागण झाल्याने या दोन रुग्णालयांना टाळे ठोकण्याची पाळी मुंबई पालिकेवर आली. हीच वेळ ठाणे पालिका ज्युपिटरवर आणणार का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विचारला जात आहे.

राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत. ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी सिव्हील व होरायझन प्राईम हे खासगी रुग्णालय अशी दोन राखीव रुग्णालय ठेवण्यात आली आहेत. माञ तरीही सरकारी नियमाला बगल देत ठाणे पालिका प्रशासनाने कोरोना रुग्णाला ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ ठेवले आहे. ठाण्यात मल्टिस्पेशलिटी रुग्णालयांची वानवा आहे. त्यात जसलोक, व्होकार्ट तसेच मुंब्रा येथील काळसेकर रुग्णालयात कोरोना रुग्णांमुळे डाॅक्टर व इतर कर्मचारी बाधित झाल्याची उदाहरणे ताजी असताना ठाणे पालिका प्रशासन नेमकी कशाची वाट पाहत असल्याचा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी विचारला आहे. 

आधीच हौस, त्यात पडला पाऊस

ज्युपिटर रुग्णालय कोरोना रुग्णालय जाहीर करा, अशी मागणी सुरवातीपासून जोर धरत होती. माञ सरकारी अनास्थेपोटी पुरेशा सुविधा नसलेले सिव्हिल व मध्यवर्ती रुग्णालय नसलेल्या होरायझन प्राईमची निवड करण्यात आली. तर आता ज्युपिटर कोव्हिड रुग्णालय यादीत नसताना देखील त्याठिकाणी कोरोना रुग्ण ठेवायचा अट्टाहास का, असा प्रश्न संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdocterडॉक्टरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMNSमनसे