शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

दिवाळीत ठाण्यात लखलखाट, ठामपाकडून रोषणाईचा साज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:34 IST

अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार...

ठाणे : अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार अभियंत्यांची मेहनत रंग लायी है, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांनी शहरातील तब्बल २०० किमीचे वर्दळीचे रस्ते अक्षरश: धुऊन काढले आहेत. तसेच पदपथ दुरु स्त करून त्यांना रंगरंगोटी केली आहे. दिवाळीपूर्वीच आखलेल्या अ‍ॅक्शन प्लानच्या माध्यमातून हे शक्य झाले असून आता अशा प्रकारची विशेष स्वच्छता वर्षभर राहावी, यासाठी १० कोटींचा निधी देण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातले आहे. काही प्रकल्पांच्या कामालादेखील सुरु वात झाली आहे. एरव्ही, शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असली, तरी दिवाळीनिमित्त शहराचे स्वरूप बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानदेखील तयार केला होता. पावसाळ्यामध्ये शहरातील अनेक रस्त्यांची आणि पदपथांची अवस्था बिकट झाली होती. अनेक ठिकाणी ते उखडले होते. रस्त्याच्या बाजूचा परिसर रंगवणे, मार्किंग करणे तसेच उखडलेले पदपथ दुरु स्त करणे, अशी मोठी मोहीम राबवली जात असल्याची माहिती शहर अभियंता अनिल पाटील यांनी दिली. वर्षानुवर्षे भंगार गाड्या, अनधिकृत पार्किंग, गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेल्या आणि येणाºयाजाणाºया नागरिकांसाठी मनस्ताप ठरलेल्या नितीन कंपनीजवळील पुलाखाली आता आकर्षक उद्यान होणार आहे.शहरातील रस्ते, चौकांनी टाकली कातविविध खेळांच्या सुविधा, नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, बालगोपालांसाठी खेळणी आणि लक्ष वेधून घेणारी आकर्षक विद्युत रोषणाई अशा सुविधांनी ही बाग जणू एक नंदनवनासारखीच भासेल. तर, दुसरीकडे मानपाडा उड्डाणपुलाखालचे स्वरूपदेखील पूर्णपणे बदलले आहे. उड्डाणपुलांबरोबरच शहरातील रस्ते, फुटपाथ, महत्त्वाच्या चौकांनीदेखील कात टाकली आहे. दिवाळीपूर्वीच या मोहिमेला सुरु वात झाली असून यामध्ये २०० किमीचे रस्ते पाण्याने धुऊन काढले आहेत. चौकदेखील धुतले असून त्यांचीही आकर्षक रंगरंगोटी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका