न्यू इंग्लिश शाळेतील विध्यार्थ्यांना स्टडी अँपचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:27 IST2025-10-02T17:27:37+5:302025-10-02T17:27:37+5:30
Ulhasnagar News: सोनाळे येथील न्यू इंग्लिश शाळेतील इयत्ता दहावीच्या १०० विध्यार्थ्यांना स्टडी अँपचे वाटप स्थापत्य अभियंता भूषण हरीभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, भूषण पाटील आदिजण उपस्थिती होते.

न्यू इंग्लिश शाळेतील विध्यार्थ्यांना स्टडी अँपचे वितरण
- सदानंद नाईक
उल्हासनगर - सोनाळे येथील न्यू इंग्लिश शाळेतील इयत्ता दहावीच्या १०० विध्यार्थ्यांना स्टडी अँपचे वाटप स्थापत्य अभियंता भूषण हरीभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, भूषण पाटील आदिजण उपस्थिती होते.
सोनाळे येथील न्यू इंग्लिश शाळेतील इयत्ता दहावीच्या मुलांना इतर मुला प्रमाणे अभ्यास करता यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते व स्थापत्य अभियंता भूषण पाटील यांच्या पर्यंत्नातून व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली फिनिक्स यांच्या माध्यमातून १०० विद्यार्थ्यांना मोफत स्टडी ॲपचे वितरण करण्यात आले. यावेळी भूषण पाटील, रोटरीचे सचिव राजेश जंगम, माजी अध्यक्ष संतोष पाटील, प्रज्ञा संत, पुजा तिवारी, पुंडलिक पाटील, रविंद्र पाटील, मानिवली शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ सोळुंके, न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा पाटील, मोतिराम नडगे, निखील गायकवाड, सजन पाटील उपस्थित होते. सोनाळे शाळेला भविष्यात लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची मदत करण्याचे आश्वासन भूषण पाटील यांनी यावेळी दिले. स्टडी ॲपचा वापर कसा करावा. हे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांनी मुलांना समजावून सांगितले. तसेच सोनाळे शाळेने मैदानी खेळात नेहमी प्राविण्य मिळवते. त्याबद्दल उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे कौतुक केले.