मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:38 IST2025-07-07T13:37:57+5:302025-07-07T13:38:26+5:30

Ulhasnagar News: वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण हरिभाऊ पाटील यांनी मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री, वाॅटर बॅग, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. दरवर्षी गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत पाटील यांच्याकडून दिली जाते.

Distribution of educational materials to children | मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप   

मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप   

-सदानंद नाईक

उल्हासनगर - वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण हरिभाऊ पाटील यांनी मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री, वाॅटर बॅग, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. दरवर्षी गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत पाटील यांच्याकडून दिली जाते.

सामाजिक कार्यकर्ते भूषण पाटील जिल्ह्यातील शेकडो गरीब गरजू मुलांचे आधारस्तंभ झाले. दरवर्षी मुलांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत केली जाते. मानवली शाळेतील मुलांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रोहिणीताई रोहिदास शेलार, वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगदिश पाटील, माजी सभापती रघूनाथ माळी, सरपंच लहू धिंडे, उपसरपंच सचिन पाटील, नंदू वेखंडे, कुमार सुतार, रविकांत गायकवाड, मुख्याध्यापक गोरखनाथ सोळूंके, शिक्षक श्रीपत ‌राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निशा ठाकरे आदीच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. यावेळी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मदतीचा स्रोत असाच सुरु राहणार असल्याचे भूषण पाटील म्हणाले.

Web Title: Distribution of educational materials to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.