शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस कटआॅफसह वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 10, 2015 00:43 IST

उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे

डोंबिवली : उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे. यामुळे गेल्या आठवडाभरापासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यातच कपातीचे दोन दिवस वगळता वीजेच्या समस्येसह कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. केडीएमसीत प्रतिदिन ३०० तर २७ गावांसाठी ४०-५० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ४० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून मिळते. उल्हास नदीतूनच ते पाणी उचलले जाते. सध्या मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस शहर हद्दीत तर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस २७ गावांमध्ये पाणीकपात केली जाते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आठवड्यातून चार वेळा पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. असे असताना जे पाणी मिळते, ते देखील सुरळीत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कल्याण पूर्वेसारखीच स्थिती डोंबिवलीतील काही भागात भेडसावते. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात मोर्चाही निघाला होता.