मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:48 PM2021-02-24T17:48:31+5:302021-02-24T17:48:56+5:30

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले .

Dinesh Bhairav Palika Standing Committee Chairman Mehta Supporter Dinesh Jain | मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन

मीरा भाईंदर पालिका स्थायी समिती सभापती मेहता समर्थक दिनेश जैन

Next

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले . शिवसेनेच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या भाजपा व दिनेश जैन यांचा निषेध करत सभात्याग केला .  महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याचा ठराव मांडला म्हणून भाजपने दिने याना सभापती पदाची दिलेली बक्षिसी असल्याचो टीका सेनेने केली .  तर मेहता विरोधी गटातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज एकमेकांना सूचक - अनुमोदक राहिल्याने बाद ठरले . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपातील मेहता समर्थक दिनेश जैन तर मेहता विरोधक गटातील राकेश शाह व सुरेश खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपातील  मतभेद चव्हाट्यावर आले होते . दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने कमलेश भोईर यांनी अर्ज भरला .  भाजपा कडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचा होणार हे स्पष्ट होते . 

तर स्थायी समितीच्या बैठकीत दिनेश जैन व भाजपा नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट पुतळा बनवण्याच्या कामास विरोध करत प्रशासनाचा प्रस्ताव बैठकीत फेटाळून लावल्याने भाजपावर टीकेची झोड उठली आहे . विविध स्तरातून दिनेश जैन व भाजपाचा निषेध होत आहे . आजच्या सभापतो पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना नगरसेवकांनी दिनेश जैन व भाजपाचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्याच्या  विरोधात देखील मतदान न करता आमचा संताप व्यक्त केल्याचे सेनेच्या नगरसेवकांनी बोलून दाखवले . 

परंतु शाह व खंडेलवाल हे दोनही उमेदवार असताना त्यांनी एकमेकांना सूचक व अनुमोदक दिले असल्याने आज बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी नियमा प्रमाणे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले .  दरम्यान शिवसेनेने सभात्याग केल्याने भाजपाचे दिनेश जैन यांना अपेक्षे प्रमाणे भाजपाची १० मते मिळाली तर काँग्रेसचे २ नगरसेवक तटस्थ राहिले . 

दिनेश जैन यांच्या विजया नंतर मेहता समर्थकांनी पालिकेत व महापौर दालनात एकच जल्लोष केला . महापौर ज्योत्सना हसनाळे , उपमहापौर हसमुख गेहलोत आदी पदाधिकाऱ्यांसह नरेंद्र मेहता , मेहता समर्थक नगरसेवक , पदाधिकारी आदींनी नवनिर्वाचित सभापती दिनेश जैन यांचे अभिनंदन केले . मेहता समर्थकांनी दिनेश यांचा विजय हा मेहतां मुळे झाल्याचे सांगत विरोधकांना त्यांची जागा मेहतांनी दाखवून दिल्याचे म्हटले . निवडणुकी आधी मेहता समर्थक स्थायी समिती सदस्यांना वरसावे येथील मेहतांच्या सी एन रॉक हॉटेल मध्ये ठेवले होते असे सूत्रांनी सांगितले . 

कोरोना संसर्ग नियमांना हरताळ 
यावेळी कोरोना संसर्गाचे नियम पालिका मुख्यालयातच पायदळी तुडवण्यात आले . सोशल डिस्टेनसिंग पुरते धाब्यावर बावलेच शिवाय महापौर., मेहतां सह बहुतांशी नगरसेवक , पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातच मास्क सुद्धा घातले नव्हते . 

Web Title: Dinesh Bhairav Palika Standing Committee Chairman Mehta Supporter Dinesh Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.