उल्हासनगर उद्धवसेनेच्या महानगरप्रमुख पदी दिलीप मिश्रा आणि मधुकर साबळे यांची वर्णी

By सदानंद नाईक | Updated: May 6, 2026 20:41 IST2026-05-06T20:40:03+5:302026-05-06T20:41:02+5:30

कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू व भीमसेन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी फळी मैदानात उतरवण्यात आली आहे.

dilip mishra and madhukar sable appointed as ulhasnagar uddhav sena metropolitan chiefs | उल्हासनगर उद्धवसेनेच्या महानगरप्रमुख पदी दिलीप मिश्रा आणि मधुकर साबळे यांची वर्णी

उल्हासनगर उद्धवसेनेच्या महानगरप्रमुख पदी दिलीप मिश्रा आणि मधुकर साबळे यांची वर्णी

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका निवडणुकीनंतर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उद्धवसेनेची शहर कार्यकारिणी जाहीर केली. शहर महानगरप्रमुख पदी दिलीप मिश्रा आणि मधुकर साबळे यांची निवड केली असून कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू व भीमसेन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी फळी मैदानात उतरवण्यात आली आहे.

 उल्हासनगर पश्चिमच्या महानगरप्रमुख म्हणून दिलीप मिश्रा तर पूर्व भागाच्या महानगरप्रमुख पदी मधुकर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पश्चिमच्या विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी राजन वेलकर, संघटक पदी कृष्णा पुजारी, शहरप्रमुख पदी शिवाजी जावळे, शहर संघटक पदी भगवान मोहिते पदी उपशहरप्रमुख सुरेश पाटील, अवतार सिंग गिल, शिवाजी हावळे, दशरथ चौधरी, करीम शेख, अशोक सातपुते, आदिनाथ पालवे, संतोष यादव तर उपविभागप्रमुख पदी संतोष गवारे, भास्कर शिंदे, नरेंद्र हिंगोरानी, अशोक जाधव, साहेबराव ससाणे आदीची निवड करण्यात आली आहे.

 शहर पूर्वच्या महानगरप्रमुख पदी मधुकर साबळे यांची निवड केली असून शहरप्रमुख पदी प्रशांत धांडे, शहर सचिव अंकुश भांडे, शहर समन्वयक बापू सावंत, शहर संघटक गजानन शिंगाडे तर उपशहरप्रमुख रवी दिवटे, राजेश कणसे, सुनील साळुंखे, यशवंत नेतकर, विभागप्रमुख नारायण शिंदे, सुनील कारेकर, रवींद्र महाजन, बाबा केळुसकर, भगवान भांडे, भारत चोळेकर आदीची निवड करण्यात आली आहे.

 महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संघटनात्मक बदलांची प्रतीक्षा होती. आता या जम्बो कार्यकारिणीच्या घोषणेनंतर उद्धवसेनेने आगामी काळात आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शहरात स्वागत करण्यात येत असून, बॅनरबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. या निवडीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, नव्या जोमाने उद्धवसेना मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

Web Title : दिलीप मिश्रा, मधुकर साबले उल्हासनगर उद्धव सेना प्रमुख नियुक्त

Web Summary : उद्धव सेना ने दिलीप मिश्रा और मधुकर साबले को उल्हासनगर का शहर प्रमुख नियुक्त किया। पार्टी का लक्ष्य आगामी चुनावों और हाल के परिणामों के बाद संगठनात्मक परिवर्तनों पर ध्यान केंद्रित करते हुए इस नई टीम के साथ आक्रामक रुख अपनाना है। घोषणा के बाद जश्न मनाया गया।

Web Title : Dilip Mishra, Madhukar Sable Appointed Ulhasnagar Uddhav Sena Chiefs

Web Summary : Uddhav Sena announced Dilip Mishra and Madhukar Sable as Ulhasnagar's city chiefs. The party aims for an aggressive stance with this new team, focusing on upcoming elections and organizational changes following recent results. Celebrations erupted post-announcement.