शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब आरोग्य योजनेत असूनही सोसावा लागला औषधांचा मोठा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:38 IST

वेदान्त रुग्णालयाचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये समावेश असल्यामुळे रुग्णालयीन खर्च आला नाही, पण रेमडेसिविर, टोकलीझुमॅबसह इतर महागड्या औषधांचा सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च सोसावा लागला.

ठाणे :कोपरी पोलीस ठाण्याचे हवालदार राजेंद्र महाडिक यांना कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यामुळे १० आॅगस्ट रोजी कोरोनाची तपासणी केली. ती ११ आॅगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना त्याचदिवशी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान १३ सप्टेंबर रोजी घोडबंदर रोडवरील वेदान्त कोविड सेंटरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. वेदान्त रुग्णालयाचा पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये समावेश असल्यामुळे रुग्णालयीन खर्च आला नाही, पण रेमडेसिविर, टोकलीझुमॅबसह इतर महागड्या औषधांचा सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च सोसावा लागला. अजून तरी ५० लाखांचे शासकीय अनुदान किंवा इतर कोणतीही मदत मिळाली नसल्याचे महाडिक यांचा धाकटा मुलगा ऋषिकेश (२३) याने सांगितले.राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी तसेच स्नेहल (२७) आणि ऋषिकेश ही दोन मुले असा परिवार आहे. सध्या ऋषिकेशने अनुकंपा तत्त्वावर पोलीस भरतीसाठी अर्जही केला आहे. महाडिक यांना कोरोनासाठीच्या जिल्हा रुग्णालयातही जावे लागायचे. तिथूनच त्यांना बाधा झाल्याची शक्यता कुटुंबीयांकडून वर्तविण्यात आली. १३ सप्टेंबर रोजी वडिलांना जेवणाचा डबा दिला. त्याचदिवशी त्यांची आॅक्सिजन पातळी कमी झाल्याचे समजले. त्यावेळी अतिदक्षता विभागात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र, रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. दोन दिवसांमध्ये त्यांना घरी सोडणार होते, परंतु अचानक त्यांच्या मृत्यूची वार्ता आल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सरकारी मदत तर सोडाच भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतनही अजून सुरू झालेले नाही. सध्या तरी रिक्षाचालक असलेले चुलते जितेंद्र महाडिक यांच्याकडे कुटुंब वास्तव्याला आहे. बहीण खासगी नोकरी करते. त्यावर घरखर्च सुरू आहे, पण पोलीस खात्यातून निवृत्ती वेतनासह इतर मदत मिळण्यासाठी गती येणे अपेक्षित असल्याचेही ऋषिकेशने सांगितले.कोपरी पोलीस ठाण्यातून राजेंद्र महाडिक यांना मोठी मदत केली. मात्र, सरकारकडून जाहीर झालेले ५० लाखांचे अनुदान, तसेच कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.