कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:27 IST2019-07-26T16:23:59+5:302019-07-26T16:27:49+5:30
भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू
ठळक मुद्दे कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. शुभम अर्जुन शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते.
कल्याण - कल्याणमधील शुभम अर्जुन शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा डेंग्यूनेमृत्यू झाला आहे. शुभम हा कल्याण पश्चिमेकडील गणेश नगर परिसरात राहत होता. मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. कालच मेंदूज्वराच्या आजाराने दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. डेंग्यूने शुभमचा मृत्यू झाल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण - शुभम अर्जुन शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) July 26, 2019