ठाण्यात लोकलमध्ये महिलेची प्रसूती, मायलेक सुखरूप                           

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 01:14 IST2018-05-05T01:14:00+5:302018-05-05T01:14:00+5:30

ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला.ही घटना मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास घडली. त्या दोघी सुखरूप असून त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.              

Delivering woman in local | ठाण्यात लोकलमध्ये महिलेची प्रसूती, मायलेक सुखरूप                           

ठाण्यात लोकलमध्ये महिलेची प्रसूती, मायलेक सुखरूप                           

- पंकज रोडेकर                   
 ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकात टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला.ही घटना मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास घडली. त्या दोघी सुखरूप असून त्यांना उपचारार्थ ठाणे सिविल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.                                  
 झेबा परवीन अन्सारी( 22) असे त्या महिलेचे नाव असून ती टिटवाळा येथील रहिवासी आहे. सकाळी राजावाडी हॉस्पिटल मध्ये तपासणी करुन संध्याकाळी 7 वाजता घरी गेल्यावर झेबाला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्याने रात्रीच तिची सासु, नवरा तिला मुंबईच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात होते. शुक्रवारी रात्री 11.15 वा.च्या त्यांनी ठाणे लोकल पकडून मार्गक्रम सुरु केला. मध्यरात्री 12 ते 12.15 वा.च्या सुमारास लोकल ठाण्यात आल्यावर झेबा हिने लोकलमध्येच एका गोडस मुलीला जन्म दिला. याचदरम्यान पोलीस आणि रेल्वे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.

Web Title: Delivering woman in local