बोधगया महाविहार मुक्तीसाठी उल्हासनगरच्या बौद्ध संघर्ष सभेत दिल्लीचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:19 IST2025-10-17T19:19:13+5:302025-10-17T19:19:40+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहर पूर्वेतील तक्षशिला कॉलेजच्या पाटांगणा वरील बौद्ध संघर्ष सभेते बोधगया महाविहार मुक्तीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली आंदोलनाचा नारा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रेणेते भन्ते विनाचार्य यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघनायक भदंत डॉ आनंद महाथेरो होते.

बोधगया महाविहार मुक्तीसाठी उल्हासनगरच्या बौद्ध संघर्ष सभेत दिल्लीचा नारा
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहर पूर्वेतील तक्षशिला कॉलेजच्या पाटांगणा वरील बौद्ध संघर्ष सभेते बोधगया महाविहार मुक्तीसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली आंदोलनाचा नारा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रेणेते भन्ते विनाचार्य यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघनायक भदंत डॉ आनंद महाथेरो होते.
बौद्ध धर्माचे पवित्रस्थान महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी भन्ते अनागरिक धम्मपाल हे श्रीलंके मधून भारतात आले. त्यांनी महाबोधी महाविहार परिसरात राबविण्यात येत असलेल्या धर्माच्या जुन्या रूढी, अंधश्रद्धा प्रथेला विरोध केला. महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात असावे यासाठी त्यांनी लढा सुरु केला. तो लढा आज आम्ही पुढे सुरु ठेवल्याचे भन्ते विनाचार्य तक्षशिला कॉलेज पाटांगणावरील सभेत म्हणाले. जगभरातील बौद्ध देशातून बुद्धगया महविहाराला देणगी मिळते आहे. परंतु त्या ठिकाणी भंतेना भोजनदान सुद्धा मिळत नाही. हे महाविहार बौद्धाच्या ताब्यात असावे, या मागणीसाठी १३४ वर्षाच्या आंदोलनाला मूर्त स्वरूप येईल. या करीता एक वेळ दिल्लीला चला. असे आवाहन भन्ते विनाचार्य यांनी सभेतुन बौद्ध जनतेला केले.
महासंघनायक भन्ते डॉ आंनद महाथेरो म्हणाले की, मी १९ वर्षाचा असतांना श्रीलंकेवरून भारतात आलो. त्यानंतर १९६९ साली उल्हासनगरला आलो. धम्मकार्या सोबत शैक्षणिक कार्य सुरु केले. तक्षशीला विद्यालय सुरु केले. आज तक्षशीला विद्यालयात ३ हजार ५०० पेक्षा जास्त मुले शिकत आहेत. या विद्यार्थ्या पैकी अनेक जण वरिष्ठ पदावर काम करीत आहेत. आम्ही भिक्कू संघाने आंदोलनकर्ते भन्ते विनाचार्य यांना पाठिंबा दिला आहे. मला विश्वास आहे एक ना एक दिवस महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळेल. संघर्षाची सुरवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
आमचा शत्रू नेमका कोण आहे हेच आम्हाला समजत नाही. असे भन्ते राहुल बोधी म्हणाले. अन्य जणांची भाषणे झालीत. बौद्ध संघर्ष सभेला आमदार डॉ बालाजी किणीकर, जेष्ठ नेते सुरेश सावंत, राहुल हंडोरे यांच्यासह विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. बौद्ध संघर्ष सभेला उपासक उपासिका यांनी प्रचंड गर्दी केले होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेखा पैठणे यांनी केले.