शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 9:21 AM

इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते.

ठळक मुद्देइसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होतेसीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली

कल्याण - इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते. फरहादचे वडिल तनवीर शेख यांनी मंगळवारी संध्याकाळी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना तुमचा मुलगा आता जिवंत नाही असं सांगितलं. संभाषणाची सुरुवात समोरच्या व्यक्तीने आधी इंग्रजीत केली, नंतर हिंदीत बोलण्यास सुरुवात केली अशी माहिती तनवीर शेख यांनी दिली आहे. सीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली. 

'यापुढे मी सहन करु शकत नसल्याने, मी फोन पत्नीकडे दिला', असं तनवीर यांनी सांगितलं. 'फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपली ओळख उघड केली नाही. फोन करण्यासाठी त्याने इंटरनेट प्रोटोकॉल क्रमांकाचा वापर केला होता', अशी माहिती तनीवर यांनी दिली आहे.

2014 मध्ये चौघे तरुण बेपत्ता झाल्यापासून तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) ही माहिती शेअर करण्यात आली आहे. 'आम्ही आमचा फोन क्रमांकही एनआयएला दिला आहे जेणेकरुन सीरिया किंवा इराकमधील भारतीय अधिका-यांशी बातचीत केल्यानंतर मिळालेली माहिती ते आमच्यापर्यंत पोहचवू शकतील', असं तनवीर शेख बोलले आहेत. अधिका-यांकडून माहितीला दुजोरा मिळाल्यानंतरच फरहादवर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. 

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे की, 'फरहाद बेपत्ता झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातच तनवीर शेख यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आम्ही आधीच एनआयए आणि एटीएसला यासंबंधी कळवलं आहे'.

नोव्हेंबर 2014 रोजी अमन नदीम तांडेल याच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारे एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मृत्यू झाल्याचं कळवलं होतं. इसीसच्या एका व्हिडीओत अमन दिसला होता, ज्यामध्ये तो गुजरात, काश्मीर आणि मुझफ्परनगरमधील मुस्लिमांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी देत होता. 

यानंतर जानेवारी 2015 मध्ये साहिन टंकीच्या खास मित्राला अज्ञात कॉलरकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. 2014 मध्ये टंकीने बेपत्ता झालेल्यांपैकी एक अरीब माजिदच्या कुटुंबियांना फोन करुन सीरियामध्ये अरीब शहीद झाल्याचं सांगितलं होतं. पण नंतर ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दोन महिन्यानंतर अरीब माजिदने स्वत:ची सुटका करुन घेत इसीसच्या तावडीतून पळ काढला आणि तुर्कीश अधिका-यांसमोर आत्मसमर्पण केलं. नंतर एनआयएने त्याला अटक केली. 

टॅग्स :ISISइसिसTerrorismदहशतवादkalyanकल्याण