भिवंडीत मृत्यूचा सापळा! खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:22 IST2026-03-21T13:21:33+5:302026-03-21T13:22:14+5:30

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला. दुगाड फाटा परिसरातील अपघातात चालक गंभीर जखमी.

Death trap in Bhiwandi! Oxygen cylinder truck overturns due to potholes; driver seriously injured | भिवंडीत मृत्यूचा सापळा! खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

भिवंडीत मृत्यूचा सापळा! खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

भिवंडी: भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि अर्धवट राहिलेल्या काँक्रीटीकरणामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आज दुगाड फाटा परिसरात ऑक्सिजन सिलेंडरने भरलेला एक ट्रक उलटल्याची भीषण घटना घडली. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खड्डे आणि खोदकामाचा फटका

भिवंडी-वाडा महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. दुगाड फाटा परिसरातून हा ऑक्सिजनचा ट्रक जात असताना, खड्ड्यांमुळे ट्रकचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने, ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

प्रशासनाचा हलगर्जीपणा चर्चेत

या महामार्गावर रस्त्यांच्या कामामुळे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही रस्त्याची स्थिती सुधारलेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून, क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title : भिवंडी: गड्ढों से हादसा! ऑक्सीजन ट्रक पलटा, ड्राइवर गंभीर रूप से घायल

Web Summary : भिवंडी में गड्ढों के कारण ऑक्सीजन सिलेंडर से भरा ट्रक पलटा, ड्राइवर गंभीर रूप से घायल। भिवंडी-वाडा राजमार्ग पर सड़क निर्माण और लापरवाही के कारण दुर्घटनाएँ बढ़ रही हैं, जिससे प्रशासनिक लापरवाही पर जनता का गुस्सा फूट रहा है।

Web Title : Bhiwandi: Pothole Accident! Oxygen Truck Overturns, Driver Seriously Injured

Web Summary : An oxygen cylinder truck overturned in Bhiwandi due to potholes, critically injuring the driver. Road construction and neglected potholes on the Bhiwandi-Wada highway continue to cause accidents, sparking public outrage over administrative negligence.

टॅग्स :Accidentअपघात