सहा महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 05:17 IST2018-05-07T05:17:42+5:302018-05-07T05:17:42+5:30

सहा महिन्यांच्या मुलासह जिना उतरणाऱ्या आईचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेल्याने तिच्या हातातील बाळ दुस-या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 The death of a six-month-old baby | सहा महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू

सहा महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू

कल्याण : सहा महिन्यांच्या मुलासह जिना उतरणाऱ्या आईचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेल्याने तिच्या हातातील बाळ दुसºया मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फेमिदा शेख (रा. उल्हासनगर) आपल्या कुटुंबीयांसह पश्चिमेतील रामबाग परिसरातील मातोश्री हॉल येथे रविवारी गेली होती. दुपारी लग्न समारंभ आटोपल्यानंतर शेख कुटुंब घरी जायच्या तयारीत होते. फेमिदा ही मोहम्मद या सहा महिन्यांच्या मुलाला घेऊन दुसºया मजल्यावरून जिना उतरत होती. जिना उतरत असताना फेमिदाचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेला आणि तिच्या हातात असलेला मोहम्मद दुसºया मजल्यावरून तळमजल्यावर पडला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत म्हणून जाहीर केले.

Web Title:  The death of a six-month-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.