ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 20:43 IST2019-01-23T20:42:48+5:302019-01-23T20:43:03+5:30
बदलापूर कात्रप विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प हा शेजारीच असलेल्या कात्रप परिसरातील डोंगरावर गेला होता.

ट्रेकिंगसाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू
अंबरनाथ - बदलापूरातील कात्रप विद्यालयातील विद्यार्थी हे ट्रेकिंगसाठी शेजारी असलेल्या डोंगरावर गेले होते. डोंगरावरुन खाली उतरत असतांना एका विद्यार्थिनीचा तोल घसरल्याने ती खाली पडली. तोल गेल्याने तिने आपल्या मैत्रीनीचा हात पकडला होता. त्या दोघी मैत्रीनी खाली पडल्याने त्यातील एकीचा मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थीनी जखमी झाली आहे.
बदलापूर कात्रप विद्यालयातील 10वीच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प हा शेजारीच असलेल्या कात्रप परिसरातील डोंगरावर गेला होता. स्काऊट गाईडचा हा कॅम्प असल्याने त्यांच्या सोबत शिक्षक देखील होते. डोंगराच्या शिखराव पोहचल्यावर हे विद्यार्थी पुन्हा खाली उतरत असतांना बदलापूर कात्रप भागात अदित्या विश्व अपार्टमेंटमध्ये राहणारी पूर्वा गांगुर्डे हिचा तोल घसरला. तिने लागलीच आपली मैत्रिण अपूर्वा खरात हीला पकडले. त्यात दोघी डोंगरावरुन खाली घसरत आल्या. त्यात पूर्वा हीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. तर अपूर्वा हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी आकस्मित निधनाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.