शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 19:20 IST

उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते.

उल्हासनगर : महापालिका लिपिक भगवान मगरे यांचे निवडणुकीचे काम करताना दुपारी मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदार केंद्रात काम करीत असतांना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर, त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं-3 सी ब्लॉक येथील मीनल अर्जुन चव्हाण विद्यालयात निवडणूक मतदार केंद्र 87 मध्ये भगवान मगरे सहकाऱ्यांसोबत गेले होते. दुपारी मतदारसंघात निवडणुकांसाठीचे काम करीत असतांना, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या मगरे यांना सहकाऱ्यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. सदरची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस व कुटुंबाला देण्यात आली.

पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने भगवान मगरे यांचा मृत झाल्याचे सांगून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. मगरे कुटुंबावर शोककळा पसरली असून ते राहत असलेल्या लालचक्की परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानDeathमृत्यूPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर