एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:49 IST2018-09-03T21:48:22+5:302018-09-03T21:49:00+5:30
भिवंडी-नाशिक मार्गावरील वडपे येथे दुचाकी अपघात होऊन लहान मुलीचा मृत्यू झाला.

एसटीच्या अपघातात मुलीचा मृत्यू
भिवंडी - भिवंडी-नाशिक मार्गावरील वडपे येथे दुचाकी अपघात होऊन लहान मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
आयेशा अब्दुल रेहमान शेख(१६) असे मयत मुलीचे नांव असून ती अब्दुल वाहिद शब्बीर(२२)याच्या दुचाकीवर बसुन नाशिक रोडवरून भिवंडीकडे येत होती. वडपा गावाजवळ त्यांची दुचाकी स्लिप होऊन खाली पडली असता दुचाकीवर बसलेली आयशा या मार्गावरून जाणाऱ्या एस.टी.बस खाली गेली.ती गंभीररित्या जखमी होऊन तीचा जागीच मृत्यु झाला.या अपघाता प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.