पतीचे पत्नीवर कटरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:52 IST2017-10-06T01:51:54+5:302017-10-06T01:52:53+5:30

न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Cut to husband wife | पतीचे पत्नीवर कटरने वार

पतीचे पत्नीवर कटरने वार

मीरा रोड : न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पत्नीला तब्बल ५० टाके पडले आहेत.
मीरा रोडच्या नयानगर, गंगा कॉम्प्लेक्समधील हीना सोसायटीत राहणाºया स्रोबर (३३) चे लग्न इमरान असला खान (३४) याच्याशी सुमारे १० वर्षांपूर्वी झाले. त्यांना ८ वर्षांचा मुलगा, तर ६ वर्षांची मुलगी आहे.
एप्रिल २०१७ मध्ये न्यायालयाने मुलांचा ताबा इमरानकडे दिला होता. परंतु, इमरानने अटीचा भंग केल्याने मे २०१७ मध्ये न्यायालयाने दोन्ही मुलांचा ताबा स्रोबरकडे दिला. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमरान स्रोबरच्या घरी गेला. मात्र, तिने दार उघडले नाही. इमरान हा मुले शिकत असलेल्या शाळेत जाण्याची शक्यता असल्याने स्रोबरने शाळेत फोन करून इमरानला मुलांना भेटू न देण्यास सांगितले. इमारन शाळेजवळ पोहोचताच त्याला मुलांना भेटण्यास नकार दिला. स्रोबर तेथे पोहोचल्यावर दोघांमध्ये भांडण झाले. शाळेने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांची समजूत काढली. स्रोबर ही पोलीस ठाण्यातून बाहेर निघाली व वडिलांसोबत बोलत होती. इमरान तेथे आला व त्याने कटरने तिच्यावर वार केले. नागरिक मदतीला धावले व इमरानला पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Cut to husband wife