Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:17 IST2021-10-27T17:14:47+5:302021-10-27T17:17:31+5:30
Jitendra Avhad on Cruise Drug Case : क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
ठाणे : ज्या क्रुझवर अमली पदार्थाची पार्टी झाली त्यात ४ हजार जणांचा समावेश होता. मात्र त्याली फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून त्यामुळे समीर वानखडे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
क्रुझ ड्रग्ज पार्टीवरुन सध्या महाराष्ट्रात चांगलेच वादळ पेटले आहे. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात आता आव्हाड यांनी केलेल्या दाव्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. ज्या क्रुजवर पार्टी झाली त्यातून सहा जणांना अटक करण्यात आले आहे. त्याठिकाणी ६ ग्रॅम अमली पदार्थ सापडले आहेत, परंतु त्यावरुन रान पेटवले जात आहे. परंतु ज्याठिकाणी ३ हजार कोटींचे अमली पदार्थ सापडले त्यावर कोणीच काही का बोलत नाही? त्यावर प्रश्न का विचारले जात नाहीत. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी माङया महाराष्ट्रात मला धमकी दिली जात आहे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर आव्हाड यांना छेडले असता क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवे असा सल्ला देतांनाच आम्ही जर का? मागचा इतिहास काढला तर सर्वाना महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. अर्धागीनी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी असे अनेक दाखले बनावट निघतात, वानखडे यांचेही त्यातील एक असावे असे सांगितले आहे. यावर आव्हाड यांनी मुनगुटीवार हे जर त्यांच्या खोटय़ा दाखल्याचे समर्थन करीत असतील तर त्यांच्या सारखा धेर्याचे कौतुक असल्याचेही त्यांनी सांगितले.