शहरी जंगल म्हणून विकसित केलेल्या उद्यानातील हजारो झाडे काढण्याच्या पालिकेच्या निर्णयावर टीका

By धीरज परब | Published: October 29, 2023 12:42 AM2023-10-29T00:42:08+5:302023-10-29T00:42:29+5:30

Mira Road: शहरी जंगलातील तब्बल ३ हजार २६७ लहान - मोठी झाडे तरण तलाव बांधण्यासाठी काढून टाकण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठत आहे . 

Criticism of the municipality's decision to remove thousands of trees from a park developed as an urban forest | शहरी जंगल म्हणून विकसित केलेल्या उद्यानातील हजारो झाडे काढण्याच्या पालिकेच्या निर्णयावर टीका

शहरी जंगल म्हणून विकसित केलेल्या उद्यानातील हजारो झाडे काढण्याच्या पालिकेच्या निर्णयावर टीका

 मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील उद्यानाच्या आरक्षणात नागरिकांच्या आरोग्यासाठी विकसित केलेल्या शहरी जंगलातील तब्बल ३ हजार २६७ लहान - मोठी झाडे तरण तलाव बांधण्यासाठी काढून टाकण्याच्या मीरा भाईंदर महापालिकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठत आहे .  सीएसआर फंडातून मिळालेल्या निधीला वाया घालवण्याचे काम पालिकेने चालविल्याने पालिकेला आर्थिक मदत करण्या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे ? 

रामदेव पार्क येथील मीनाताई ठाकरे मंडई व सभागृह च्या मागे उद्यानासाठी असलेल्या आरक्षण क्रमांक २३० च्या मोकळ्या भूखंडावर शहरी जंगल उभारण्याची संकल्पना तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या संकल्पनेतून महापालिकेने मंजूर केली . सोनी म्युजिक व ग्रीन यात्रा यांच्या सीएसआर फंड मधून मियावाकी पद्धतीचे जंगल साठी १० हजार रोपांची लागवड करण्यात आली होती . गेल्या वर्षी मार्च मध्ये त्याचे लोकार्पण केले गेले . येथे दाट जंगल निर्माण झाले असून परिसर हिरवागार व निसर्गरम्य वाटू लागला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी शासना कडून ४ ठिकाणी ऑलम्पिक दर्जाचे तरण तलाव व व्यायामशाळा बांधण्याच्या कामांना मंजुरी मिळवली आहे . त्यानुसार महापालिका एक तरण तलाव व जिम सदर २३० क्र . च्या आरक्षणात विकसित करणार आहे . मात्र त्यासाठी येथील मियावाकी [पध्दतीच्या जंगलातील ३ मीटर पेक्षा जास्त उंचीची ६०७ झाडे तर त्या पेक्षा कमी उंचीची २ हजार ६६० झाडे काढून टाकण्याची मागणी पालिकेच्या बांधकाम विभागाने केली आहे . त्या नुसार उद्यान विभागाने कार्यवाही सुरु केली आहे.

येथील ३ हजार २६७ झाडे काढून त्याचे पुनर्रोपण केले जाणार असल्याची सूचना उद्यान विभागाने प्रसिद्ध करून त्यासाठी हरकती सूचना मागवल्या आहेत . त्याची माहिती होताच पालिकेवर टीकेची झोड उठू लागली आहे . सिमेंटच्या जंगलात प्रदूषण प्रचंड वाढत असताना लोकांना  शुद्ध हवा व ऑक्सिजन सुद्धा मिळू द्यायचे नाही हे अमानवीय आहे .  मुळात उद्यानच्या आरक्षणात तेही येथे भारत असलेले जंगल काढून तरण तलाव बांधण्या ऐवजी अन्य पर्यायी भूखंड बघावा . आधी झाडे लावायची आणि ती वर्ष दोन वर्षात पुन्हा काढून टाकायची असला बेगडी माझी वसुंधरा विरोधातला कारभार पालिकेने बंद करावा अशी मागणी होत आहे . 

Web Title: Criticism of the municipality's decision to remove thousands of trees from a park developed as an urban forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.