उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या मुलाकडून जबर मारहाण व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अदखलपात्र गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: February 25, 2026 18:00 IST2026-02-25T17:59:37+5:302026-02-25T18:00:48+5:30
मारहाण झालेला इसम मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आला नाही

उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या मुलाकडून जबर मारहाण व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अदखलपात्र गुन्हा
सदानंद नाईक, उल्हासनगर : शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने एका चामडी पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चौफर टिका झाली. मारहाण झालेल्या इसमाच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्यानंतर इसम गेला कुठे? याचा शोध पोलीस शोध घेत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरात एका इसमाला चामडी पट्ट्याने ऐक जण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाण करणारा मुलगा शिंदेसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा मुलगा असल्याची चर्चा रंगली. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मारहाण झालेल्या इसमाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच त्याला मेडिकलसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले.
रुग्णालयाच्या वैधकीय अहवालनुसार पुढील गुन्हा दाखल होणार आहे. मात्र मारहाण झालेला इसम मध्यवर्ती रुग्णालयातून परत आला नाही. त्यामुळे पुढील कारवाई करता आली नाही. अशी अवताळे यांनी माहिती दिली आहे. पोलीस व नागरिक ज्या इसमाला मारहाण झाली. त्याचा शोध घेत आहे. तसेच मारहाण करणाऱ्या शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलावर कारवाई का नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे.