Crime : भाईंदरमधील तरुणीवर अपहरण करून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:42 IST2023-04-18T09:42:29+5:302023-04-18T09:42:39+5:30

Crime News : भाईंदर पूर्वेच्या २८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी साेमवारी आई व मुलगा आणि त्याच्या साथीदारास नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

Crime: Kidnapped and raped a girl in Bhayander | Crime : भाईंदरमधील तरुणीवर अपहरण करून बलात्कार

Crime : भाईंदरमधील तरुणीवर अपहरण करून बलात्कार

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या २८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी साेमवारी आई व मुलगा आणि त्याच्या साथीदारास नवघर पोलिसांनी अटक केली आहे. दानिश शेख, अफसाना शेख आणि चिराग शेख (सर्व रा. कुर्ला) अशी आराेपींची नावे आहेत. पोलिसांनी पीडित मुलीची वांद्रे येथून सुखरूप सुटका केली आहे.

नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अश्विनी (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीचे दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून अपहरण केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. ती वडिलांसोबत घरी जात असताना ही घटना घडली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणीच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून वांद्र्यातून तरुणीची सुटका केली. तिचे अपहरण करणाऱ्या दानिश व त्याचा साथीदार चिराग यांना अटक केली आहे. दानिश याने तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यासोबत अश्लील फोटो काढले. त्यानंतर तिला धमकावत नवी मुंबईत तिच्यावर बलात्कार केला.

साकिनाका पाेलिसांत ३ एप्रिललाच गुन्हा
दानिशवर तरुणीच्या फिर्यादीवरून साकिनाका पोलिस ठाण्यात ३ एप्रिलला बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी हद्दीच्या कारणावरून तपासात विलंब झाल्याने दानिश याला वेळीच अटक न झाल्याने त्याने तिचे रविवारी रात्री अपहरण करून पुन्हा बलात्कार केल्याचे सकृतदर्शनी उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Crime: Kidnapped and raped a girl in Bhayander