Vasai: सलग तिसरा षटकार ठोकताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका; जागीच गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:37 IST2025-01-28T05:37:12+5:302025-01-28T05:37:55+5:30

Vasai Cricketer Dies of Heart Attack: क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्याने खेळावरील प्रेमातूनच जीव गमावला.

Cricketer suffers heart attack while hitting third consecutive six dies on the spot | Vasai: सलग तिसरा षटकार ठोकताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका; जागीच गमावले प्राण

Vasai: सलग तिसरा षटकार ठोकताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका; जागीच गमावले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळ: पहिल्या दोन चेंडूंवर जबरदस्त सिक्स मारलेले... प्रेक्षकांकडून तिसऱ्या सिक्सरची मागणी होत होती... सलग तिसरा सिक्स मारण्यासाठी तो पुढे सरसावलाही... मात्र, नियतीला ते मंजूर नव्हते... क्रीझवरच तो कोसळला... पुन्हा कधीही न उठण्यासाठी. वसई तालुक्यातील कोपर या गावातील सागर वझे या अवघ्या २७ वर्षांच्या क्रिकेटपटूचा खेळाच्या मैदानातच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  चांगला खेळाडू अशी सागर वझेची पंचक्रोशीत ओळख. क्रिकेटवर निरातिशय प्रेम. पहिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. 

मैदानातच तरुणाचा मृत्यू
शुक्रवारी सायंकाळी सामना रंगात आला होता. सागर क्रीझवर होता. त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्ला चढवत दोन षटकार ठोकले. परंतु सागरला खेळावरील प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परंतु त्याने खेळावरील प्रेमातूनच जीव गमावला.

त्याचा खेळ आता पाहता येणार नाही...
सलग तिसरा षटकार मारण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. तो क्रीझबाहेर आला आणि आता तिसरा षटकार मारणार एवढ्यात त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो जागीच कोसळला. 
मैदानात उपस्थित सर्व खेळाडूंनी तत्परतेने सागरला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुण वयात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याची भावना परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी व्यक्त केल्या.

Web Title: Cricketer suffers heart attack while hitting third consecutive six dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.