क्रिकेट प्रशिक्षक विजय शिर्के यांचे आकस्मिक निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 18:43 IST2020-12-20T18:42:45+5:302020-12-20T18:43:04+5:30
मुंबई क्रिकेट संघटनेने कुशल प्रशिक्षक आणि संघटक गमावला

क्रिकेट प्रशिक्षक विजय शिर्के यांचे आकस्मिक निधन
ठाणे : मुंबईच्या मैदान क्रिकेटला जवळून पाहणारे माजी वरिष्ठ क्रिकेटपटू, संघटक आणि प्रशिक्षक विजय शिर्के यांचे शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.
कॉलेज जीवनात शिर्के यांनी रुईय्या महाविद्यालयातून खेळताना आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. तर सनग्रेस मफतलाल च्या संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळले होते. ठाण्याच्या सरस्वती विद्यालयाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते. वैयक्तिक प्रशिक्षण वर्गाद्वारे त्यांनी ठाणे, कल्याण डोंबिवलीतील अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाचे ते निवडसमिती सदस्य होते. त्यांच्या पश्चात मुलगा संग्राम, पत्नी आणि सून असा परिवार आहे.