crane collided with the tanker; Long queues on the Mumbai-Ahmedabad highway | टँकरवर क्रेन आदळली; मुंबई अहमदाबाद महामार्गावर लांबच लांब रांगा

टँकरवर क्रेन आदळली; मुंबई अहमदाबाद महामार्गावर लांबच लांब रांगा

- शशिकांत ठाकूर

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर प्रोपोलीन गॅसच्या टँकर व क्रेन मध्ये भीषण अपघात त्या मुळे महामार्गावर लांबच लांब रांगाल्या आहेत.


   पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील  आंबोली जवळ महामार्गावर रात्री 12 वाजताच्या सुमारास ही घडली असून ब्रिजवर उभ्या असलेल्या क्रेन ला टँकरने धडक दिल्याने हा अपघात झाला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून महामार्ग वाहनाचा तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


 दरम्यान घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल  झाल्यानंतर वाहतूक सर्व्हिस रोड वरून संथगतीने सुरू आहे.जीवितहानी नाही मात्र  गॅस टँकर असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांकडू उपाय म्हणून वाहतूक वळवली आहे

Web Title: crane collided with the tanker; Long queues on the Mumbai-Ahmedabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.