शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

मतांसाठी नगरसेवकांचीही फिल्डिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 2:19 AM

केडीएमसी, उल्हासनगर, अंबरनाथ पालिका; बैठका, पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींवर भर

- प्रशांत माने कल्याण : लोकसभा निवडणुकीतील कल्याण मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवार स्वत: मेळावे आणि रॅली काढण्यावर भर देत असताना नगरसेवकांची फळीही जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. बैठका, प्रभागांतील पदयात्रांसह व्यक्तिगत भेटीगाठींवर नगरसेवकांकडून भर दिला जात आहे.केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ५३, भाजपचे ४३, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी २, मनसे १०, बसपा १, एमआयएम १ असे राजकीय पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या केडीएमसीतील शिवसेनेचे डोंबिवलीत १२, तर ग्रामीण आणि कल्याण पूर्व भागात एकूण १७ नगरसेवक आहेत. भाजपचे डोंबिवलीत १९ नगरसेवक आहेत. तर, कल्याण ग्रामीण आणि पूर्व मिळून १८ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे चार नगरसेवक आहे. तर, राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक लोकसभा क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण पूर्व-ग्रामीण या भागांत नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. मनसेने अप्रत्यक्षपणे का होईना, भाजपला विरोध म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मनसेचे येथे सहा नगरसेवक आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेतील नगरसेवकही आपापल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत.युतीची स्थिती?शिवसेना आणि भाजपकडे नगरसेवकांची भक्कम फळी आहे. प्रभागातील मतदारांचा संपर्क ठेवण्याबरोबरच बैठका, पदयात्रांवर भर देण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने सेनेचे सर्वच नगरसेवक कामाला लागले आहेत. सेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपचे नगरसेवकही प्रभागांमध्ये प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.आघाडीची स्थिती?आघाडीकडे नगरसेवकांचे फारसे बळ नाही. पण, राष्ट्रवादीचे कल्याण पश्चिम या भिवंडी लोकसभेतील केडीएमसीतील दोन नगरसेवक प्रचारात उतरले आहेत. काँग्रेसचे चार नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेत आहेत. राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभली असली, तरी प्रत्यक्षपणे प्रचार रॅली आणि सभांमध्ये उपस्थिती न लावता बैठका घेऊन भाजपविरोधी प्रचार करण्यावर मनसेचा कल आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाulhasnagarउल्हासनगरambernathअंबरनाथ