Coronavirus: कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या 114 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 22:26 IST2020-04-07T22:25:33+5:302020-04-07T22:26:27+5:30

मंगळवारी वाढलेल्या रुग्णांच्या संख्येने ठामपामधील कोरोना ग्रस्तांची संख्या ही 24 झाली असून आघाडीवर केडीएमसी असून त्याची संख्या 34 झाली आहे

Coronavirus: Two more deaths in the thane district due to Corona pnm | Coronavirus: कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या 114 

Coronavirus: कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या 114 

ठाणे: ठाणे जिल्ह्यात मंगळवारीही आणखी आठ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ही 114 झाली . तर मंगळवारी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्याही सात झाली आहे.नव्याने सापडलेल्या आठ रुग्णांमध्ये पाच रुग्ण हे मिराभाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. दोन रुग्ण हे ठामपा तर एक रुग्ण हा केडीएमसी मधील आहे. त्याचबरोबर कल्याण - डोंबिवली तसेच मिराभाईंदर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याने भितीच्या वातावरणात दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.

मंगळवारी वाढलेल्या रुग्णांच्या संख्येने ठामपामधील कोरोना ग्रस्तांची संख्या ही 24 झाली असून आघाडीवर केडीएमसी असून त्याची संख्या 34 झाली आहे. नवीमुंबई-28, मिराभाईंदर -22,ग्रामीण-3, उल्हासनगर-1अंबरनाथ -1,कुळगाव- बदलापूर -1 असेएकूण जिल्ह्यात 114 रुग्ण आढळून आले आहेत. 

मृत रुग्णांची संख्या
ठाणे महापालिका- 1
केडीएमसी- 2
नवीमुंबई- 1
मिराभाईंदर- 1
अंबरनाथ- 1
कुळगाव- बदलापूर- 1

Web Title: Coronavirus: Two more deaths in the thane district due to Corona pnm