शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Corona Vaccine : मोठा दिलासा! ठाणे जिल्ह्याला मिळाला ७० हजार ४०० लसींचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 4:24 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : ठाणे महापालिका प्रशासनाने विकेंड टाळेबंदीचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आले होते.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकीकडे वाढ होता असताना, दुसरीकडे अपुऱ्या लसींच्या साठ्य अभावी लसीकरण मोहिमे राबवायची कशी याची चिंता आरोग्य प्रशासनाला भेडसावत आहे. त्यात १ मे पासून सर्वत्र १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे देखील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला देखील अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून लसच उपलब्ध होत नसल्याने ठाणे महापलिका क्षेत्रात अवघ्या एका केंद्रामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. तर, जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण मोहीम ठप्प पडली आहे. त्यात बुधवारी ठाणे जिल्ह्यासाठी ७० हजार ४०० इतका लसींचा साठा प्राप्त झाल्याने तूर्तास लसीकरणाची चिंता मिटली आहे. यामध्ये ४५ वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी ३८ हजार ४०० इतका कोव्हीशिल्ड लसींचा तर, १८ ते ४४ वयोगटासाठी ३२ हजार इतका कोव्हाक्सीन लसींचा साठा प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाबाधीतांची वाढती रुग्ण संख्या आणि त्याचबरोबर या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत होत असलेली वाढ ही आरोग्य विभागाची व ठाणेकरांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. त्यात दुसरीकडे लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यात ठाणे महापालिका प्रशासनाने विकेंड टाळेबंदीचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आले होते. त्यातच मागील आठवडाभर लस कमी अधिक प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होत होत्या. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात प्राप्त होणाऱ्या लस मिळत असल्याने अनेकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना लसीकरण केंद्रांच्या संख्येत घट करावी लागली आहे. तर, अनेकदा लसीकरण बंद देखील ठेवण्याची वेळ ओढवली होती.

४५ वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण, अनेकांना दुसरा डोस मिळत नसल्याने ओरड सुरू झाली आहे. त्यात १ मे पासून ठाणे जिल्ह्यासह सर्वत्र १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला, मात्र ही मोहीम राबविण्यासाठी लागणारा लसींचा साठा मात्र, अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या मोहिमेबाबत देखील साशंकता निर्माण झाली आहे. असे असतांना, मंगळवार रात्री पर्यंत जिल्ह्यातील विविध संस्थांकडे साठाच उपलब्ध न झाल्याने आरोग्य विभाग चितेत पडला होता. अशातच बुधवारी सकाळी जिल्ह्यासाठी ७० हजार ४०० लसी प्राप्त झाल्याने आरोग्य विभागाकडून व्यक्त होणार्या चिंतेला तूर्तास दिलासा मिळाला आहे. यामध्ये यामध्ये ४५ वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी ३८ हजार ४०० इतका कोव्हीशिल्ड लसींचा तर, १८ ते ४४ वयोगटासाठी ३२ हजार इतका कोव्हाक्सीन लसींचा साठा प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, बुधवारी सकाळी ठाणे जिल्ह्यासाठी लसींचा ७० हजार ४०० चा साठा उपलब्ध झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामीण क्षेत्रात त्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात पुन्हा वेगाने लसीकरण मोहीम राबविण्याससुरुवात झाली. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 28 केंद्राच्या माध्यमातून पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

प्राप्त लसींचा साठा

महापलिका                         कोव्हीशिल्ड            कोव्हाक्सीन

ठाणे                                        ७५००                   ७०००कल्याण डोंबिवली                   ५९००                    ६०००मिराभाईंदर                             ७०००                    ३०००नवीमुंबई                                 ९०००                    ५०००ठाणे ग्रामीण                            ६५००                    ७०००उल्हासनगर                            १५००                     १५००भिवंडी                                    १०००                     २५००

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे