CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 20:31 IST2021-05-26T20:29:40+5:302021-05-26T20:31:11+5:30
CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार २८३ झाली आहे.

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू
ठाणे - ठाणे जिल्ह्यात बुधवारी ९०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख १२ हजार ५६७ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ९ हजार ९ झाली आहे. ठाणे शहर परिसरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार २८३ झाली आहे. शहरात ५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ८७० झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत २१४ रुग्णांची वाढ झाली असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत ११५ रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ५६ रुग्ण सापडले असून २ मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत १९ बाधीत असून ०२ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये १३८ रुग्ण आढळले असून ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २९ रुग्ण आढळले आहेत. बदलापूरमध्ये २१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १२५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर ०१ जणाच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ३५ हजार ७५९ झाली असून आतापर्यंत ८५३ मृत्यूंची नोंद आहे.