शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

CoronaVirus : रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसरा; मुंबईलाही टाकले मागे; यंत्रणा हतबल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 9:00 AM

ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे.

सुरेश लोखंडे -ठाणे : कोरोनाच्या जागतिक संकटातून काही अंशी सावरत असतानाच ऐन वर्षाच्या टप्प्यात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येत देशातील आठ जिल्हे आघाडीवर असून राज्यातील या आठ जिल्ह्यांमध्ये देशात ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पुणे आणि नागपूर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबईला मागे टाकत ठाणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. (CoronaVirus: Thane district ranks third in the country in number of patients; Mumbai also left behind) ठाणे जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याच्या वृत्तास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दुजोरा दिला आहे. तब्बल दहा हजार रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील मृत्युदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा चिंतेत आहे. यासाठी शुक्रवारी उशिरापर्यंत आरोग्य उपसंचालकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासह आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाय योजनावर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचेही डॉ. रेंघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.    जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढीचे प्रमाण कल्याण डोंबिवली महापालिका पाठोपाठ ठाणे महापालिका परिसरात आहे. यानंतर नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरात रुग्णसंख्या वाढताना आढळून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आढळलेले १ हजार १५३ रुग्णसंख्या ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदली गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७४ हजार २८३ रुग्णसंख्या आढळलेली आहे. त्यापैकी २ लाख ५९ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यू ६ हजार ३२६ झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.  या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि जिल्ह्यातील महापालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या वाढतेय- कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत शनिवारी कोरोनाचे नवीन ४०९ रुग्ण आढळले आहेत. तर, शुक्रवारी ४१६ रुग्ण आढळले होते. - मनपाने गुरुवारपासून घातलेल्या निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक बसण्याऐवजी संख्या वाढत आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या दोन हजार ८८८ आहे.- तर, उपचाराअंती बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६२ हजार ४५४ आहे. मागील २४ तासांत २३८ रुग्ण बरे झाले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसthaneठाणे