Coronavirus: Silence on Phadke Road in Dombivali due to corona mac | Coronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट

Coronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट

- जान्हवी मोरे

डोंबिवली-हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली. ही स्वागतयात्रा सातासमुद्रापार पोहचली. कोरोनाची लागण पसरु  नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे आज डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा निघालीच नाही.

डोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणात अशा प्रकारची घटना प्रथम घडली आहे. त्यामुळे आज डोंबिवलीचा फडके रोडवर सन्नाटा पाहावयास मिळाला.
स्वागत यात्न काढू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी यापूर्वीच केले होते. त्यामुळे सगळया स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती अजून बिघडत चालल्याने लॉकडाऊनचा कालावधी पंतप्रधानांकडून वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आजची स्वागतयात्रा काढली गेली नाही.

डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणोश मंदिराजवळ सगळे तरुण ,तरुणी आबाल वृद्ध व बच्चे कंपनी जमून सगळीच एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतात. भागशाळा मैदानातून स्वागत यात्ना काढली जाते. त्यात 90 पेक्षा जास्त संस्था सामाजिक जनजागृतीचा संदेश देत चित्ररथ काढतात. यावेळी कोपर पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने यात्ना काढण्यावर ठाम मत नव्हते. त्यात कोरोनाची भर पडली. समाज स्वास्थासाठी व देशहितासाठी यात्रा काढली गेली नसली तरी यात्रा ऑनलाईन असे असा दावा आयोजकांकडून करण्यात आला होता. फडकेरोडवर तरुणाई जमलीच नाही.

लॉकडाऊन व कोरोनामुळे केलेल्या आवाहनाला सुज्ञ डोंबिवलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. मात्र सोशल मीडियावर एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा देत कोरोनामुक्त भारत अशा शुभेच्छा दिल्या. काहींनी व्हाटॅसअप व्हीडीओ कॉल करुन एकमेकांशी संवाद साधला. कोरोनासाठी एकत्न न येणं आणि एकमेकांना न भेटणं हीच कोरोनामुक्त भारताची सुरुवात असू शकते असेही अनेकांनी एकमेकांना मेसेज पाठविले. नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीतून फारसे कोणी मंदिराकडे फिरकले नाही. मंदिरातील पूजारीनी पूजाअर्चा केल्याचे समजते.

स्वागतयात्रेच सहभागी होणारे तरुण तरुणींशी संवाद साधला असता तेजल लकेश्री हिने सांगितले की, मराठी नववर्षाला स्वागतयात्रेची परंपरा डोंबिवली शहराने सुरूवात केली. त्यात आज खंड पडला याचे दुख आहे. देशावर कोरोनाचे संकट आहे. सर्व नागरिक सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करीत आहेत. कोरोना हरेल आणि देश जिंकेल तेव्हा पुढच्या वर्षी आणखी मोठय़ा उत्साहात यात्र काढता येईल. यानिमित्ताने एकमेकांशी भेटणो होते पण भेटता आले नसले तरी सोशल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वागतयात्र संयोजन समितीने ऑनलाईन कार्यक्रमातून गुढीपाडव्याचे दर्शन घडविणार असे सांगितले होते पण परिस्थिती बिकट होत असल्याने ते ही शक्य झाले नसल्याचे दिसून येत आहे.

प्रतीक वेलणकर म्हणाला, नववर्ष स्वागतयात्रेच्या निमित्ताने आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र जमून गणेशाचे दर्शन घेतो. पारंपारिक वेशभूषा परिधान केल्याने आपली संस्कृती ही आपण जपत असल्याचा आनंद होतो. सर्व एकत्रित जमतो त्यांचा एक वेगळा आनंद असतो यावर्षी मात्र आम्ही सर्वानी एकजूटीने सरकारी आदेशाचे पालन क रीत आहोत. लोकांनी सरकारी आदेशांचे गांर्भीयाने पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये.

साक्षी शिर्सेकर म्हणाली, नववर्ष स्वागतयात्रेला डोंबिवलीच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर स्वागतयात्रेच्या आयोजकांनी यात्र रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य वाटतो. कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुढील वर्षाच्या स्वागतयात्रेत आम्ही मित्र मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ.

Web Title: Coronavirus: Silence on Phadke Road in Dombivali due to corona mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.