CoronaVirus News in Thane : कोरोनामुक्त प्रभाग समितीस ५० लाख बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:29 AM2020-05-19T06:29:12+5:302020-05-19T06:31:21+5:30

सेल्फी स्पर्धा गटात नागरिक विषांणूपासून संरक्षणासाठी कोणत्या नाविण्यपूर्ण पद्धती, संकल्पना राबवितात त्याचा व्हिडीओ महापालिकेने दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात.

CoronaVirus News in Thane : 50 lakh prize to Coronamukta Ward Committee | CoronaVirus News in Thane : कोरोनामुक्त प्रभाग समितीस ५० लाख बक्षीस

CoronaVirus News in Thane : कोरोनामुक्त प्रभाग समितीस ५० लाख बक्षीस

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'माझा प्रभाग, कोरोनामुक्त प्रभाग' या स्पर्धेचे आयोजन केले असून पंधरा दिवसांत प्रभाग समिती क्षेत्रात कोणताही नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद न होणे आणि सध्याचे बाधित रुग्ण निगेटिव्ह होवून डिस्चार्ज झाल्यास अशा प्रभाग समितीस विकासकामासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तर एक महिन्याच्या कालावधीत नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद न होणे आणि असलेले बाधित रुग्ण बरे होवून डिस्चार्ज मिळालेल्या समितीस विकासकामांसाठी ५० लक्ष रूपयांचा निधी बक्षीस देण्यात येणार आहे.
सेल्फी स्पर्धा गटात नागरिक विषांणूपासून संरक्षणासाठी कोणत्या नाविण्यपूर्ण पद्धती, संकल्पना राबवितात त्याचा व्हिडीओ महापालिकेने दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात. सेल्फ डिकलेरेशन स्पर्धा गटात एखाद्या कुटुंबात कोणी कोरोनाबाधित आढळल्यास त्याची माहिती तसेच कोव्हीड सदृष्य ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे आढळल्यास त्याची माहिती कुटुंबातील व्यक्तीने महापालिकेसोबत शेअर करावयाची आहे. सेफ्टी क्ल्यू व्हिडीओ स्पर्धेत कोव्हीडचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, बचाव करण्यासाठी नव्याने कोणकोणत्या उपाययोजना अंमलात आणल्या त्याबाबतची ३० सेकंदाची व्हिडीओ क्लीप तयार करून महापालिकेस पाठवायची आहे.
एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रक्टीस व्हिडीओ स्पर्धेतंर्गत कुटुंबात भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या व्यक्तींकडून होम डिलिव्हरीद्वारे प्राप्त वस्तू स्वीकारताना कोणती विशेष काळजी घेतली जाते याची माहिती ३० सेंकदाच्या व्हिडीओद्वारे पाठवायची आहे. याच गटात आपल्या कुटुंबातील व्यक्ती भाजीपाला, दूध, अन्नधान्य किंवा इतर वस्तू स्वत: आणत असतील तर कोणती काळजी घेतात,याचीही माहिती ३० सेकंदाच्या व्हिडीओमधून पाठवायची आहे.

विविध गटांत होणार स्पर्धा

ही स्पर्धा सेल्फी स्पर्धा, सेल्फी क्ल्यू व्हिडीओ, एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट प्रॅक्टिस व्हिडीओ, सेन्सिटिव्ह सर्व्हिस एक्स्ट्रा केअर सेफ्टी बेस्ट पॅ्रक्टिस व्हिडीओ, संपूर्ण प्रभाग समिती (भाग १), संपूर्ण प्रभाग समिती(भाग २) अशा गटांत आयोजिली आहे. आपला प्रभाग, शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी नागरिक, संस्था, मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus News in Thane : 50 lakh prize to Coronamukta Ward Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे