CoronaVirus News: ‘जबाबदारी’ पूर्ण करण्याकरिता फेरसर्वेक्षण; आरोग्य विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:39 AM2020-10-08T01:39:35+5:302020-10-08T01:39:47+5:30

छेडा रोड, पेंडसेनगरमध्ये घरोघरी जाऊन पुन्हा वैद्यकीय तपासणी

CoronaVirus News: Resurvey to fulfill 'responsibility'; Order of the Department of Health | CoronaVirus News: ‘जबाबदारी’ पूर्ण करण्याकरिता फेरसर्वेक्षण; आरोग्य विभागाचे आदेश

CoronaVirus News: ‘जबाबदारी’ पूर्ण करण्याकरिता फेरसर्वेक्षण; आरोग्य विभागाचे आदेश

Next

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आदेशावरुन सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कल्याण-डोंबिवलीत घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय तपासणी करताना काही भागात बंद घरांबाहेर कुटुंबांची तपासणी झाल्याचे स्टीकर्स चिकटवल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्याने केडीएमसी वैद्यकीय आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. ज्या भागात असे थातूरमातूर सर्वेक्षण केले गेले तेथे पुन्हा नागरिकांची वैद्यकीय तपासणी करुन सर्वेक्षण करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन किती जणांची वैद्यकीय तपासणी केली याची नोंद करायची आहे. घरातील प्रत्येक सदस्यांची आॅक्सिजन पातळी व तापमान तपासणे गरजेचे आहे. परंतु काही ठिकाणी तपासणी न करताच केवळ नागरिकांची संख्या नोंदवली तर, बंद घरांच्या ठिकाणीही तपासणी न करताच सदस्यांची नोंद करुन तपासणी झाल्याचे स्टीकर दरवाजाबाहेर लावले गेले होते. डोंबिवली पूर्वेकडील अयोध्यानगरी तसेच छेडा रोड आणि पेंडसेनगरमध्ये हे प्रकार घडले. लोकमतच्या वृत्तानंतर सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनी पुन्हा छेडा रोड आणि पेंडसेनगर भागामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली. काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध होत असला तरी ज्याला तपासणी करायची आहे त्याची तपासणी झालीच पाहिजे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्वेक्षणाचा आढावा
प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी : ग्रामस्थांसह आरोग्य पथकांशीही साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आरोग्य सर्वेक्षणाशी संबंधित विविध प्रश्न विचारत मुरबाड तालुक्याच्या मोहोप गावातील कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी डोळखांब आणि सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही भेटी दिल्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी मुरबाड व शहापूर तालुक्यामध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते उपस्थित होत्या. जिल्हाधिकाºयांनी सरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाºया मोहोप गावाला भेट देऊन गावोगावी मोहीम कशी सुरू आहे याचा आढावा घेतला.
या दोन्ही प्रशासकीय प्रमुखांनी संयुक्त दौरा करून प्रत्यक्ष गावकºयांच्या घरी जाऊन माहिती घेतली. आरोग्य सर्वेक्षण टीमशी संवाद साधून त्यांनाही मार्गदर्शन केले. या मोहिमेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर या कालावधीत पूर्ण होणार आहे.

६५ टक्के सर्व्हे पूर्ण
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ टक्के नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे, त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून संदर्भ सेवा पुरविणे, हा मुख्य उद्देश या मोहिमेचा आहे.

Web Title: CoronaVirus News: Resurvey to fulfill 'responsibility'; Order of the Department of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.