CoronaVirus News: आरोपीला आणणाऱ्या चार पोलिसांना कोरोना, तिघे रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:10 AM2020-06-27T00:10:58+5:302020-06-27T00:11:08+5:30

आरोपीला पकडून आणणा-यांपैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या चौघा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तिघांना रुग्णालयात तर एकास घरी ठेवले आहे.

CoronaVirus News: Four policemen who brought the accused to Corona, three hospitalized | CoronaVirus News: आरोपीला आणणाऱ्या चार पोलिसांना कोरोना, तिघे रुग्णालयात दाखल

CoronaVirus News: आरोपीला आणणाऱ्या चार पोलिसांना कोरोना, तिघे रुग्णालयात दाखल

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या एका बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करणाºया आरोपीला पकडून आणणा-यांपैकी स्थानिक गुन्हे शाखेच्या चौघा पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील तिघांना रुग्णालयात तर एकास घरी ठेवले आहे.
शीतलनगरमध्ये एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी बारमध्ये राहणारा बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी व सफाई कामगार नरेश पंडित यांची १ जून रोजी हत्या झाली होती. याप्रकरणी ५ जून रोजी रात्री पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील बारमधून आरोपी कल्लूला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असलेल्या कल्लूला १५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यावर त्याच्या संपर्कातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी चाचणी केली असता, तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चाचणी केली असता २३ जून रोजी आणखी तिघा कर्मचाºयांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील एका कर्मचाºयास भार्इंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात तर दोघांना ठाण्याच्या वेदांत रुग्णालयात दाखल केले असून, एक पोलीस कर्मचारी घरीच उपचार घेत आहे.

Web Title: CoronaVirus News: Four policemen who brought the accused to Corona, three hospitalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.