शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Coronavirus News: कोरोना: पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्याचीही मोठी हानी- अनिल कुंभारे

By जितेंद्र कालेकर | Published: October 14, 2020 12:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोमुळे आॅन डयूटी शहीद होणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या कुटूंबीयांप्रमाणेच पोलीस खात्याचीही मोठी हानी झाली आहे. ...

ठळक मुद्दे शहीद श्रीकांत वाघ यांच्या कुटूंबीयांना ६० लाखांच्या धनादेशाचे वाटपलोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोमुळे आॅन डयूटी शहीद होणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या कुटूंबीयांप्रमाणेच पोलीस खात्याचीही मोठी हानी झाली आहे. ती कधीही भरुन न येणारी आहे. या कुटूंबीयांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. शासनाकडून मिळणाºया अनुदानाबाबत तसेच अनुकंपा तत्वावर पाल्यांना नोकरीवर घेण्याबाबतही प्रशासकीय पातळीवर या कुटूंबीयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.कोरोनामुळे शहीद झालेले कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक श्रीकांत वाघ यांच्या पत्नी संगितीका वाघ यांना राज्य शासनाच्या वतीने कोविड योद्धा म्हणून देण्यात येणाºया ५० लाखांच्या अनुदानाचा धनादेश तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने पोलीस कल्याण निधीतून देण्यात येणारा दहा लाखांचा अशा ६० लाखांच्या धनादेशाचे वाटप कुंभारे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी या शहीद पोलीसांच्या कुटूंबीयांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. नौपाडा पोलीस ठाण्याच्या सभागृहात शहीद पोलीस कुटूंबीयांसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वाघ कुटूंबीयांना या धनादेशाचेही वाटप त्यांनी केले.‘रिअ‍ॅलिटी’ चेक अंतर्गत ‘आधी लढा कोरोनाशी, आता मदतीसाठी लढा’ या मथळयाखाली ठाण्यातील शहीद पोलीस कुटूंबीयांच्या व्यथा ‘लोकमत’मध्ये ५ आॅक्टोंबर रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. याचीच गांभीर्याने दखल घेऊन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याबाबतच्या प्रक्रीयेला गती देण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते. अतिरिक्त आयुक्त संजय येनपुरे यांनी याबाबतचा पाठपुरावा केला. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.ज्या कुटूंबीयांना शासकीय अनुदानाचे वाटप केले जात आहे, त्यांनी त्याचा योग्य प्रकारे विनियोग करावा. गुंतवणूक आणि बचत कशा प्रकारे करावी. अनुकंपा तत्वावर या कुटूंबीयांच्या वारसांना पोलीस खात्यात नोकरी मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, शासनाकडून कशाप्रकारे आर्थिक मदत मिळवून दिली जाईल, त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्याचा पत्रव्यवहार कसा करावा, याचीही इथ्यंभूत पण थोडक्यात माहिती त्यांनी दिली. वारसा हक्काच्याही काही अडचणी आहेत का? याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी प्रशासनाच्या वतीने लिपीकांनीही तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.यावेळी ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या तीन परिमंडळांमधील १२ शहीद पोलीस कुटूंबीय उपस्थित होते. वाघ यांच्या प्रमाणेच इतरांचेही प्रस्ताव शासन दरबारी पाठविले आहेत. त्याबाबतची प्रक्रीया सुरु असल्याचेही ते म्हणाले.यावेळी परिमंडळ एक ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ पाच- वागळे इस्टेटचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, अविनाश सोंडकर आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस