CoronaVirus News: ठाण्यात ६२४ कोरोनाचे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 19:43 IST2020-11-05T19:43:28+5:302020-11-05T19:43:36+5:30
अंबरनाथमध्ये नव्याने ३४ रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही.

CoronaVirus News: ठाण्यात ६२४ कोरोनाचे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे नव्याने ६२४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख १४ हजार ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात केवळ आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ४०९ झाली आहे.
ठाणे शहरात १६४ नवे रुग्ण आढळले आहेत. या शहरात ४७ हजार ४८२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार १६४ झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपात १६० रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५० हजार ६३३ रुग्ण बाधीत झालेले असून एक हजार दहा मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये २२ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या मनपात मृतांची संख्या ३४३ असून बाधितांची संख्या दहा हजार ३२३ झाली आहे. भिवंडीला आठ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ९९४ असून मृतांची संख्या ३३५ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ५७ रुग्ण सापडले, एकही मृत्यू झाला नाही. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ८८४ असून मृतांची संख्या ७२६ झाली आहे
अंबरनाथमध्ये नव्याने ३४ रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या सात हजार ४१७ असून, मृतांची संख्या २७३ झाली आहे. बदलापूरला २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ४६३ झाले आहे. या शहरात आजही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२ रुग्णांची वाढ झाली असून एकाचाही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १७ हजार ४९ आणि आतापर्यंत ५४५ मृत्यू झाले आहेत.