CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ६०४ रुग्णांची भर, दिवसभरात १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 01:34 IST2020-11-05T01:26:31+5:302020-11-05T01:34:06+5:30

CoronaVirus News :कल्याण-डोंबिवलीत ९४ रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ४५ बाधितांची नोंद झाली आहे.

CoronaVirus News: 604 patients in Thane district on Wednesday, 14 people died in a day | CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ६०४ रुग्णांची भर, दिवसभरात १४ जणांचा मृत्यू

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ६०४ रुग्णांची भर, दिवसभरात १४ जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६०४ वर आली असून १४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.  ठाणे महानगरपालिका हद्दीत १६८ बाधितांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४७ हजार ३१८ तर, मृतांची एक हजार १६१ वर गेली आहे. 
कल्याण-डोंबिवलीत ९४ रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात ४५ बाधितांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये २४ रुग्णांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद करण्यात आली. 
 

Web Title: CoronaVirus News: 604 patients in Thane district on Wednesday, 14 people died in a day