CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 20:21 IST2020-12-02T20:20:32+5:302020-12-02T20:21:08+5:30
CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ५६२ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली.

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ७१ रुग्ण झाले आहेत. तर, सात रुग्णांच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ७०२ झाली आहे. तर दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे परिसरात १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ५६२ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता एक हजार २४० झाली आहे. नवी मुंबई मध्ये ११३ रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ९८९ झाली आहे आहे. तर येथे आतापर्यंत ४८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत.
कल्याण - डोंबिवलीत १३७ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता येथे ५४ हजार २९७ बाधीत असून एक हजार ६२ मृतांची नोंद आहे. उल्हासनगरात २१ नवे रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात दहा हजार ९०२ रुग्ण संख्या असून मृतांची संख्या ३५३ झाली आहे.
भिवंडी शहरात २ बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार २९२ झाले असून मृतांची संख्या ३४५ आहे. मीरा भाईंदरमध्येत ५२ रुग्णांची वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद आज केली. आता बााधीत २४ हजार २७४ झाले आहेत, तर, मृत्यू ७५८ नोंदले आहेत.
अंबरनाथमध्ये ४५ रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ९२८ झाली असून मृतांची संख्या २८९ आहे. बदलापूरमध्ये ३१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या ८ हजार ११७ झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १०१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात ३२ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता १८ हजार २२० बाधितांची नोंद झालेली असून मृतांची संख्या ५६५ नोंदली आहे.