शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४७७ नविन रुग्णांची भर: १४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 9:56 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात ७ जून रोजी १३८ कोरोना बाधीतांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार ५७ तर, मृतांचा आकडा ११६ वर पोहोचला. जिल्ह्यातील बाधितांचा संख्या ११ हजार ३५९ च्या घरात गेली असून रविवारी दिवसभरात १४ जणांचा मृत्यु झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बाधितांचा संख्या ११ हजार ३५९ च्या घरातठाणे शहरात १३८ नविन रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेने रविवारी कोरोनाबाधितांनी शंभरी पार केली. त्यामुळे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४७७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. दरम्यान १४ रु ग्णांचा मृत्यु झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ११ हजार ३५९ तर, मृतांचा आकडा ३६६ इतका झाला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात ७ जून रोजी १३८ कोरोना बाधीतांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांचा आकडा चार हजार ५७ तर, मृतांचा आकडा ११६ वर पोहोचला. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेत ११५ रु ग्णांची नोंद झाली. याठिकाणी एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधीतांचा आकडा दोन हजार ८८६ तर, मृतांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. कल्याण डोंबिवलीत २९ रु ग्णांची नोंद झाली असून त्याठिकाणी दोघांचा मृत्यू झाला. याठिकाणी एक हजार ४१८ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ४० झाला. तर मीरा भार्इंदरमध्ये ३४ नविन रु ग्णांच्या नोंदीसह चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ९८३ तर, मृतांची संख्या ५५ वर गेली आहे. भिवंडीमध्ये १८ रु ग्णांच्या नोंदीसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे बाधितांची २६१ तर, मृतांची संख्या १६ वर गेली. उल्हानगरमध्ये ८३ रु ग्णांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याठिकाणी बाधितांची संख्या ५७९ तर मृतांची संख्या २३ वर गेली आहे. बदलापूरमध्ये १७ रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ३०९ झाली. अंबरनाथमध्ये ३३ रु ग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या ३५६ वर गेली आहे. ठाणे ग्रामीण भागात १० रु ग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ५०२ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य