Coronavirus News: 310 coronaviruses, 800 meals per day! | Coronavirus News: कोरोनाची रुग्णसंख्या 310, दररोजची जेवणावळ 800 माणसांची!

भाजपने घेतला आक्षेप

ठळक मुद्दे क्वारंटाईन केंद्रांचे 33 लाख 65 हजारांचे बिलभाजपने घेतला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या आपत्तीत काही ठराविक ठेकेदारांनी महापालिकेकडून मोठे बिल उकळण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एप्रिलच्या दुस-या पंधरवडयात केवळ ११० ते ३१० रु ग्णसंख्या असताना दररोज ८०० माणसांच्या जेवणावळीचे तब्बल ३३ लाख ६५ हजारांचे बिल काढण्यात आले. या धक्कादायक प्रकाराला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला असून याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
कोरोनाच्या काळात शहरातील विविध भागात मार्चच्या शेवटच्या आठवडयापासून कॉरंटाईन केंद्र उभारणीला सुरुवात झाली होती. या केंद्रात दाखल झालेले रु ग्ण आणि कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा आणि दोन वेळचे जेवण पुरविण्यासाठी 280 रु पयांचे पॅकेज मंजूर केले होते. ठाणे महापालिका हद्दीत 15 एप्रिल रोजी रु ग्णांची संख्या 110 होती. तर 30 एप्रिल रोजी रु ग्णसंख्या 310 पर्यंत पोहचली होती. 15 ते 30 एप्रिल या काळात कॉरंटाईन केंद्रातील रु ग्ण, महापालिकेतील वैद्यकीय कर्मचारी आदींना सुमारे 800 जणांना जेवण दिल्याचे बिल आकारले आहे. या बिलापोटी महापालिकेकडून 33 लाख 65 हजारांचे बिल मंजूर झाले. नुकत्याच झालेल्या महासभेत या बिलावर शिक्कामोर्तबही करण्यात आले.
एप्र्रिल महिन्यात शहरात संसर्ग झालेले अनेक रु ग्ण खाजगी रु ग्णालयात दाखल झाले होते. त्यासाठी ठाणे महापालिकेने चार खाजगी रु ग्णालयांना मंजुरीही दिली होती. तर काही रु ग्ण व रु ग्णांच्या कुटुंबियांना भार्इंदरपाडा, कासारवडवली आणि मुंब्रा येथील कॉरंटाईन केंद्रात दाखल केले. मात्र, दररोज 800 जणांना जेवण देण्याएवढी रु ग्णसंख्या निश्चित नव्हती, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे.
शहरातील क्वारंटाईन केंद्रात दररोज कोणाला जेवण दिले गेले. त्यातील रु ग्ण, रु ग्णांचे नातेवाईक आणि वैद्यकिय कर्मचाºयांची यादी प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

Web Title: Coronavirus News: 310 coronaviruses, 800 meals per day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.