CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 12:52 IST2020-04-29T12:24:06+5:302020-04-29T12:52:29+5:30

पत्नीसह मध्यरात्री रुग्णालयातून घरी परतले

CoronaVirus NCP leader Anand Paranjape returns from hospital with wife kkg | CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

CoronaVirus: राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांची कोरोनावर मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काल मध्यरात्री परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल यांना  रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. एका नेत्याच्या संपर्कात आल्यानं आनंद परांजपे यांना कोरोनाची लागण झाली होती. 

आनंद परांजपे कोरोनाची बाधा झालेल्या एका नेत्याच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांची पत्नी सोनल यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचं अहवालातून समोर आलं. त्यानंतर दोघांवर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. काल मध्यरात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Web Title: CoronaVirus NCP leader Anand Paranjape returns from hospital with wife kkg