coronavirus: खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांकडून दररोज साडेबारा हजारांची आकारणी, नारायण पवार यांची आयुक्तांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 01:57 IST2020-05-14T01:57:07+5:302020-05-14T01:57:19+5:30

रुपये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

coronavirus: Narayan Pawar's complaint to the Commissioner about privet hospital | coronavirus: खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांकडून दररोज साडेबारा हजारांची आकारणी, नारायण पवार यांची आयुक्तांकडे तक्रार

coronavirus: खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्तांकडून दररोज साडेबारा हजारांची आकारणी, नारायण पवार यांची आयुक्तांकडे तक्रार

ठाणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्यवर्गीय रुग्णांना माफकदरात उपचार मिळण्यासाठी महापालिकेने ठरविलेले दर ठाण्यातील खाजगी
रुग्णालयांनी फेटाळले आहेत. यामुळे कोरोनाबाधिताला दररोज किमान १२ हजार ५०० चा भुर्दंड बसत आहे. ९ ते १० पेशंट असलेल्या कक्षातील एका बेडच दर साडेचार हजार रुपये, तीन हजार ६५० रु पयांचे पीपीई कीट व मास्क, अडीच हजार रुपये डॉक्टर फी यांच्यासह औषधे व चाचण्यांसाठी दररोज १२ हजार ५००

रुपये आकारले जात आहेत. या प्रकाराबद्दल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी संताप व्यक्त करून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे संबंधित रुग्णालयांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
अमरावतीहून ठाण्यातील निवासस्थानी परतलेल्या एका ७१ वर्षांच्या वृद्धाची सतर्कता म्हणून नौपाडा येथील खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घाईघाईत घोडबंदर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात नेले. ते मध्यमवर्गीय असल्यामुळे कुटुंबीयांनी सामान्य कक्षाची मागणी केली होती. मात्र, कोरोनासाठी केवळ आयसीयू व एचडीयू युनिट आहेत. सामान्य कक्ष अस्तित्वात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना एचडीयू (हाय डिफेडन्सी युनिट) कक्षात दाखल केले. तेथील रूममध्ये ९ ते १० रुग्णांना ठेवले असल्याचे रु ग्णाचे म्हणणे आहे.
तेथे त्यांच्यावर आठ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याची कार्यवाही सुरू केली. डिस्चार्जआधी त्यांनी पुन्हा कोरोना चाचणीचा आग्रह धरला. मात्र, त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून तब्बल एक लाख एक हजार १३९ रुपयांचे बिल हाती सोपविले. त्याने रुग्णासह कुटुंबीयांनाही धक्का बसला. स्पेशल वॉर्ड वा आयसीयूमध्ये दाखल नसतानाही दररोज साडेबारा हजार रु पयांप्रमाणे बिल कसे आले, असा या रु ग्णाचा सवाल आहे. आपली कैफियत त्यांनी नगरसेवक पवार यांना सांगितली.

त्यानुसार पवार यांनी यासंदर्भात ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांना पत्रव्यवहार केला असून कारवाईची मागणी केली आहे. महापालिका आयुक्तांनी अधिकचे पैसे घेणाऱ्या हॉस्पिटलसाठी नियमावली तयार केली आहे. परंतु, त्याला हरताळ फासला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन घोडबंदर येथील संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी. तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमधील कारभाराची चौकशी करून ठाण्यातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.

एकाच पीपीई कीटवर रु ग्ण तपासणी
पीपीई कीटसाठी दररोज तीन हजार ६७५ रु पये आकारले गेले. मात्र, माझ्या परिचित रु ग्णाच्या मते कक्षातील ९ ते १० जणांची डॉक्टरांकडून एकाच फेरीत तपासणी होत होती. अशा परिस्थितीत प्रत्येक रु ग्णाकडून पीपीई कीटसाठी शुल्क कसे आकारले जाते, असा सवाल त्यांनी केला. महापालिकेने सामान्य कक्षासाठी चार हजार रु पये दर निश्चित केल्याचीही संबंधित रु ग्णालयाला माहितीच नाही. तेथे केवळ आयसीयू व एचडीयू असे दोन कक्ष आहेत. महापालिकेचा कोणताही आदेश रु ग्णालयाकडे आला नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: coronavirus: Narayan Pawar's complaint to the Commissioner about privet hospital