CoronaVirus in Thane धक्कादायक! ठाण्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:21 IST2020-05-09T20:20:01+5:302020-05-09T20:21:33+5:30
सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

CoronaVirus in Thane धक्कादायक! ठाण्यातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यातील अन्य एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या आमदाराला कॉरण्टाइन करण्यात आले होते. त्यानंतर आता या आमदाराचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ठाण्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे.
दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्यापेक्षा माझी तब्येत आता खूप चांगली असल्याची माहिती त्यांनी लोकमत'शी बोलताना दिली. लवकरच मी घरी परतेन, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली
महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन
अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण