CoronaVirus महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 05:15 PM2020-05-09T17:15:10+5:302020-05-09T17:21:56+5:30

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे शरद पवार म्हणाले.

CoronaVirus Narendra Modi should intervene for workers with states; Sharad Pawar's appeal hrb | CoronaVirus महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

CoronaVirus महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन

Next

मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यातील रोजगारासाठी आलेले लाखो मजूर महाराष्ट्रात अडकून बसले आहेत. त्यांना त्यांची राज्ये घेत नाहीत. या मजुरांना महाराष्ट्र सरकार एसटीने त्यांच्या राज्यात सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल  यांच्याशी यासंबंधात चर्चा केल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे शरद पवार म्हणाले. तर गोयल यांनी देखील या मजुरांसाठी रेल्वेची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
मात्र, काही राज्ये या मजुरांना घेण्यासाठी विरोध करत आहेत. महाराष्ट्र एसटी द्यायला तयार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता या राज्यांशी मध्यस्थी करावी असे आवाहन करत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.


 


उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांनी महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. यामुळे या कामगारांमध्ये रोष निर्माण झाला होता. तर अनेकजण पायीच रुळांवरून किंवा रस्त्याने त्यांच्या राज्याकडे निघाले होते. यामुळे काल औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातात १६ जणांना प्राण गमवावे लागले होते. यानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यात येऊ इच्छिणाऱ्या कामगारांना मी तुमची सोय करणार आहे, धीर धरा असे आवाहन केले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण

नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

Web Title: CoronaVirus Narendra Modi should intervene for workers with states; Sharad Pawar's appeal hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.